कृषीमाळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

“सदगुरू श्री.श्री.सा.का. च्या बाॅयलर अग्निप्रदिपनाचे,सुदर्शन होमाचे पावसाच्या सरींनी केले स्वागत “

भूमीपुत्र न्यूज/शाहरुख मुलाणी

सदगुरू श्री श्री रविशंकरजी यांच्या कृपाशीर्वादाने” सेवा निसर्गाची उन्नती आपली”या ध्येयाने प्रेरित होऊन गेली बारा वर्ष सांगली ,सातारा ,सोलापूर जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या व सर्व घटकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या सदगुरू श्री श्री साखर कारखाना लि श्रीनगर राजेवाडी ता.आटपाडी या कारखान्याचा १२ वा ऊस गळीत हंगाम सन २०२३-२४ चा बॉयलर अग्निप्रदिपन व सुदर्शन होमाचे मा.चेअरमन एन. शेषागिरीराव यांचे शुभ हस्ते व व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, व्यवस्थापकीय संचालक उदय जाधव,संचालक मोहन बागल, उषाताई मारकड, जनरल मॅनेजर रामराव रेड्डी यांचे प्रमुख उपस्थितीत शास्त्री कापरे गुरुजी यांच्या धार्मिक व विधियुक्त पूजेने व मंत्र पठणाने उत्साही वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कांतीलाल नाईक नवरे , बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेचे चेअरमन बाळासाहेब पाटील, कोल्हापूर जिल्हा धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते कृष्णा पुजारी, गादेगावचे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बागल, राजेवाडी चे सरपंच कैलास शिरकांडे, पिलीव भागातील कृष्णा डेअरीचे चेअरमन श्यामतात्या मदने,पिलीव सोसायटीचे संचालक कृष्णांत मदने पाटील, इटकी चे सरपंच कृष्णा सावंत,बचेरी सरपंच राणी गोरड, फळवणीचे तंटामुक्ती अध्यक्ष ज्योतीराम अवताडे माळशिरस,पंढरपुर, आटपाडी, माण ,सांगोला तालुक्यातील सरपंच, उपसरपंच अनेक संस्थांचे चेअरमन ,व्हा. चेअरमन व ऊस उत्पादक सभासद व सर्व घटकातील मान्यवर उपस्थित होते.

सर्व ऊस उत्पादकांना दिवाळी गोड होईल असा कारखान्याकडून निश्चितच निर्णय घेतला जाईल. व चालू हंगामात देखील ऊस उत्पादकांचे समाधान होईल.

उदय जाधव व्यवस्थापकीय संचालक

ऊस उत्पादकांचे व शेतकऱ्यांचे समाधान हेच आमचे समाधान समजून कारखाना भविष्यकाळात सुद्धा सभासदांचे हित जोपासणार.

बाळासाहेब कर्णवर पाटील,व्हाईस चेअरमन

कार्यक्रमासाठी सर्व खाते प्रमुख, कर्मचारी, कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन एच आर अँड एडमिन मॅनेजर सचिन खटके व त्यांचे सहकाऱ्यांनी होते.तर प्रास्ताविक केन मॅनेजर सुनिल सावंत यांनी केले.सदर कार्यक्रमाचे वेळी मेघगर्जनेसह पावसांच्या सरींनी एकप्रकारे स्वागतच केल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!