माळशिरस तालुकासामाजिकसोलापूर जिल्हा

नातेपुते शहर झाले शिवमय! शिवजन्मोत्सव प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘किल्ले बनवा स्पर्धा’ उत्साहात संपन्न; रोहन अडगळे व चैतन्य पिसे ठरले प्रथम​

भूमीपुत्र न्यूज

दिवाळीच्या सुट्टीत हजारो बालहस्तांनी दुर्गनिर्मितीच्या क्षेत्रात आपला कलाकुसर कौशल्याचा ठसा उमटवत सुंदर, अभिमान जागवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले निर्माण केले. शिवजन्मोत्सव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या ‘किल्ले बनवा स्पर्धेत’ तब्बल ६० स्पर्धकांनी अत्यंत उत्साहात सहभाग घेतला होता. या स्पर्धेमुळे संपूर्ण नातेपुते शहर शिवमय झाले असून, गल्लोरोषणाईसोबतच गल्लोरोघरी फक्त शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचीच चर्चा रंगली होती.​

​या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे, केवळ श्रीमंत किंवा शहरी भागातील मुलेच नव्हेत, तर गरीब विद्यार्थ्यांनी आपल्या झोपडीसमोर सुंदर किल्ले उभारले. विशेष म्हणजे, शिक्षणाची गोडी लागलेली व नंदीवाले समाजातील विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेत सहभाग घेऊन अतिशय सुंदर किल्ले तयार केले. एक किल्ला बनवण्यासाठी केवळ एक बालकच नव्हे, तर त्याचे कुटुंब आणि लगतचे मित्रमंडळी सगेसोयरे मदतीसाठी सरसावले होते. अनेकांनी किल्ल्यांवरील ऐतिहासिक घटनांचे सुंदर नाट्यीकरण करून ते सादर केले, तर अनेक इतिहासप्रेमींनी या बालदुर्गांना भेटी देऊन बालकांचे भरभरून कौतुक केले.

या स्पर्धेचे प्रायोजकत्व मामासाहेब पांढरे मित्र मंडळाने स्वीकारले होते.​इतिहास संशोधकांचे परीक्षण व उल्लेखनीय किल्ले​स्पर्धेतील सहभागींनी साकारलेल्या ऐतिहासिक दुर्गांपैकी रायगड, प्रतापगड, राजगड, सुवर्णगड आणि तोरणा या किल्ल्यांनी विशेष करून ग्रामस्थांचे व पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले. या अटीतटीच्या स्पर्धेचे परीक्षण नामवंत इतिहास संशोधक प्रशांत सरूडकर, मंगेश दीक्षित आणि संजय ढवळे यांनी अत्यंत निष्णातपणे पार पाडले.

​स्पर्धेचा मानकरी व निकाल​या बहुप्रतिक्षित स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत

:​प्रथम क्रमांक (विभागून):​रोहन अडगळे​चैतन्य पिसे​द्वितीय क्रमांक (विभागून):​समर्थ पागे​अधिराज देशमुख​श्रवण खंडागळे​तृतीय क्रमांक (विभागून):​श्रावी उराडे​राजवर्धन चिंचकर​वीर जोरे​उत्तेजनार्थ पारितोषिक:​विनायक काळे, शिवांश कोरटकर, कैवल्य राऊत, रविराज कोळी, राम इंगोले आणि आयुष लाळगे.

​​

निकाल जाहीर प्रसंगी शिवजन्मोत्सव प्रतिष्ठानचे संस्थापक सुनील राऊत, किशोर पलंगे, श्रीगणेश पागे, शशि कल्याणी, विवेक राऊत, धनंजय पवार यांच्यासह स्पर्धेचे मुख्य प्रायोजक मामासाहेब पांढरे, अतुल बावकर, मोहित जाधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.​

या स्पर्धेचा दिमाखदार बक्षीस वितरण समारंभ लवकरच आयोजित करण्यात येणार असून, विशेष आकर्षण म्हणून सर्व स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका ऐतिहासिक किल्ल्याची प्रत्यक्ष सफर (सहजदर्शन) घडवून आणली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!