अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीबाबत….
प्रकाश पाटील, राजकुमार पाटील, पांडुरंगराव देशमुख ,माणिक वाघमोडे डॉ. रामदास देशमुख ,शंकर देशमुख, गटाची वेट अँड वॉच ची भूमिका
भूमीपुत्र न्यूज
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असताना सत्ताधारी विजयसिंह मोहिते पाटील पॅनल विरुद्ध माळशिरस तालुक्यातील सर्व विरोधकांनी एकत्र येऊन तयार केलेले माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनल अशी सरळ दुरंगी लढत सुरू असतानाच माळशिरस तालुक्यातील सत्ताधारी गट मोहिते पाटील यांचे पारंपारिक विरोधक असणारे पाणीव येथील काँग्रेसचे माजी सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार पाटील ,राष्ट्रवादीचे नेते व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पांडुरंगराव देशमुख राष्ट्रवादीचे प्रांतिक नेते शंकर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिक वाघमोडे, माजी जि प सदस्य डॉ रामदास देशमुख,राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर इंगळे सर देशमुख यासह माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील मतदारांच्या झालेल्या बैठकीत या निवडणुकीत कोणती भूमिका घ्यावयाची ? हे येत्या दोन दिवसात पश्चिम भागातील नेते व मतदारांशी चर्चा करून येत्या दोन दिवसात निर्णय जाहीर करणार अशी चर्चा झाल्याने या नेत्यांच्या भूमिकेकडे तालुक्यातील सर्वांचेच लक्ष लागले आहे.
या नेत्यांच्या वेट अँड वॉच च्या भूमिकेमुळे माळशिरस तालुक्यातील विरोधकांमधील दुही दिसून येत असून सर्व विरोधकांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली होती असे चित्र तालुक्यात पहावयास मिळत होते परंतु माळशिरस तालुक्यातील या पारंपारिक विरोधकांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याने माळशिरस तालुक्यातील सत्ताधार्यांच्या विरोधात असणाऱ्या विरोधकांमध्ये पुन्हा एकदा समन्वयाचा अभाव दिसून आला आहे रविवार दि 23 एप्रिल रोजी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या श्रीराम शिक्षण संस्थेवर दुपारी 1 .00 वा झालेल्या बैठकीत माळशिरस तालुक्यातील नेतेमंडळींसह पूर्व भागातील मतदार, कार्यकर्ते, नेते उपस्थित होते या बैठकीत येत्या दोन दिवसात निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितल्याने या नेत्यांच्या वेट अँड वॉच भूमिकेचा नेमका कोणाला फायदा व नेमका कोणाला तोटा होतो याबाबत राजकीय विश्लेषकामधून अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत .
माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन ,संचालक यांची आज पाणीव येथे बैठक झाली असून या सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर आम्ही सर्व नेतेमंडळींनी माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उर्वरित आमच्या मतदारांशी चर्चा केल्यानंतर येत्या दोन दिवसात आमची भूमिका जाहीर करू.
प्रकाश पाटील, माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी सोलापूर