कोळेगांव येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिर सभामंडप साठी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या माध्यमातून १० लाख रुपये निधी मंजूर
आचारसंहिता लागण्यापूर्वी ग्रामपंचायत ने कागदपत्रे सादर न केल्यास १० लाख रुपये निधी माघारी जाण्याची शक्यता
भूमीपुत्र न्यूज
कोळेगांव ता माळशिरस येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर भारतीय जनता पक्षाचे माढा लोकसभा मतदार संघाचे तत्कालीन खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्या माध्यमातून १० लाख रुपये निधी मंजूर झाला असून सदर ठिकाणी सभामंडप बांधण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ग्रामपंचायत कडे नसल्याने व आचारसंहिता लागण्यापूर्वी कागदपत्रे देऊन काम सुरू न झाल्यास १० लाख रुपये निधी शासनास माघारी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन निर्णय क्रं विकास 2023/प्र.क्र ६९०/यो ६ दि १४ डिसेंबर २०२३ च्या आदेशासोबतची अनुसूची २५१५ १२३८ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील कोळेगांव येथील ज्ञानेश्वर मंदिरासमोर ग्रामपंचायत जागेमध्ये सभामंडप बांधण्याकरिता तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी १० लाख रुपये निधी मंजूर केला होता.
अपुरी कागदपत्रे असल्याने सदर ठिकाणी मंजूर झालेले काम रद्द होण्याची शक्यता असून सदर १० लाख रुपये विकास निधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मिळवण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.