जनसेवेसाठी स्वतःला झोकुन देणाऱ्यांचा इतिहास घडतो /अशोक को-हाळेजी
भूमीपुत्र न्यूज
जनसेवेसाठी स्वतःला झोकुन देणाऱ्या माणसांचाच इतिहास घडतो,सहकार महर्षींनी जनकल्यानाचा वसा जोपासला म्हणूनच त्याचे नाव अजरामर झाले.डाॅ.धवलसिंह मोहिते-पाटील हे जनसेवा संघटनेच्या माध्यमातुन आपल्या पुर्वजांचा वारसा पुढे घेवुन जात आसल्याचे वक्तव्य प.पु अशोक को-हाळेजी यांनी केले.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त अकलूज येथील विजय चौकात महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने निरंकारी सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी निरंकारी मिशनचे ज्ञानप्रचारक प.पु. अशोक को-हाळेजी यांनी मुख्य विचारपीठावरुन बोलताना सहकार महर्षींच्या कार्याला उजाळा दिला.याप्रसंगी आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पदमजादेवी मोहिते-पाटील,सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डाॅ. धवलसिंह मोहिते-पाटील,चेरब्स स्कुलच्या चेअरमन उर्वशीराजे मोहिते-पाटील,माणिकराव मिसाळ,शिवाजीराव इंगवले देशमुख,आण्णासाहेब इनामदार,आण्णासाहेब शिंदे,सतिश पालकर,राजाभाऊ गुळवे,रणजीतसिंह देशमुख,नवनाथ साठे,मयूर माने आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प.पु. अशोक को-हाळेजी म्हणाले की,मिळालेला मनुष्य जन्म सार्थकी लावायचा असेल तर मानवतेची सेवा करुन सत्कार्य करावे,निरंकारी मिशनच्या माध्यमातून सदगुरु सुदीक्षाजी महाराज या ब्रम्हज्ञानाद्वारे इश्वरी साक्षात्कार करुन देतात.सकलाचा परमपिता एकच ईश्वर आसून तो प्रत्येक प्राणीमात्रात आत्मरुपाने आहे.प्रेम,नम्रता व सहनशिलता या मानवी गुणांना धारण करुन सकलांनवर प्रेम करत राहवे असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमासाठी सोलापूर,सातारा,पुणे जिल्ह्यातील हाजारो निरंकारी अनुयायी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गायकवाड यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवादल युनिट ८२५ चे सेवदल यांचेसह विनायक माने,दिलीप कांबळे,सुधीर रास्ते,मयुर माने,दिपक सुत्रावे,राहुल जाधव,दिलीप सकट,श्रीमंत लांडगे, यांनी परिश्रम घेतले.