अंधश्रध्दा ,कर्मकांडाला तिलांजली देत वेळापूरच्या माने परिवाराने सत्यशोधक पद्धतीने केली वास्तुपूजा
भूमीपुत्र न्यूज
फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन तर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 191 व्या जयंती , सत्यशोधक स्थापना दीन व शताब्दी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधक पदधतीप्रमाणे प्रा. नवनाथ माने प्रा. रत्ना माने यांच्या नवीन वास्तूची वास्तूपूजा रघुनाथ ढोक यांनी समाजसुधारक महात्मा फुले यांच्या वेशभूषेत पार पाडून त्यांच्या नवीन निवासास सत्यशोधक निवास,वेळापूर असे नामकरण केले.
सत्यशोधक पद्धतीने वेळापूर परिसरात प्रथमच एका शिक्षकाने महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होऊन कृतीने कार्य पार पाडीत, नवीन वर्षाच्या सुरुवातीस सत्यशोधक पद्धतीने आपल्या नवीन घराची वास्तुपूजा केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे यावेळी ज्येष्ठ समाजसेवक मारुती यादव ,अनिल फुले यांचे हस्ते नवनाथ माने व रत्ना माने या दाम्पत्याचा समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र देण्यात आले. तर माने परिवाराने 500 उपस्थित मान्यवरांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथ भेट देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन मारुती यादव, अनिल फुले व माने परिवाराच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमासाठी पायल गायकवाड , सिद्धी फुले व सृष्टी माने यांनी विशेष परिश्रम घेतले