निमगाव ग्रामपंचायतीसाठी रस्सीखेच ?
सरपंच पदासाठी सुभाष साठे व राजेंद्र तोरणे यांच्यात होणार दुरंगी लढत
भूमीपुत्र न्यूज
माळशिरस तालुक्यातील राजकीय व सामाजिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजली जाणारी निमगाव (मगर) या ग्रामपंचायतीमध्ये 17 सदस्य संख्या असून सरपंच पद हे अनुसूचित जातीसाठी राखीव असून या ग्रामपंचायतीमध्ये एकूण 6 प्रभाग असून मतदार संख्या 6284 एवढी आहे तर यामध्ये 3189 पुरुष आणि 3095 स्त्री मतदार आहेत या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातून एकूण 6 जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते परंतु उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या बुधवार दिनांक 7 डिसेंबर रोजी विनायक भिकाजी तोरणे, नितीन अशोक तोरणे , डॉ लक्ष्मण भानुदास साठे व सरपंच पदासाठी दोन अर्ज भरलेल्या अर्जापैकी एक अर्ज सुभाष रामचंद्र साठे यांनी अर्ज माघारी घेतल्याने निमगावचे माजी सरपंच सुभाष रामचंद्र साठे , राजेंद्र सोपान तोरणे या दोघांमध्ये दुरंगी लढत होत असून या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
निमगाव ग्रामपंचायतची निवडणूक दुरंगी होत असून पारंपारिक दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज आहेत सत्ताधारी गट हा स म शंकराव मोहिते पाटील सह. साखर कारखान्याचे संचालक व मल्लसम्राट रावसाहेब मगर यांचा असून विरोधी गट हा भाजपचे जिल्हा सह प्रभारी के के पाटील यांचा आहे तर बहुतांश वेळा ग्रामपंचायतीची सत्ता मोहिते पाटील समर्थक असणाऱ्या गटाने उपभोगली आहे ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असून यापूर्वीच निमगाव चे सरपंच पद उपभोगलेले सुभाष रामचंद्र साठे हे के के पाटील यांच्या गटाकडून निवडणूक लढवत आहेत तर युवा नेतृत्व म्हणून राजेंद्र सोपान तोरणे हे रावसाहेब मगर यांच्या गटाकडून निवडणूक लढवत आहेत दोघेही उमेदवार विकासाच्या मुद्द्यावर मत मागणार आहेत परंतु प्रचाराचा जसजसा जोर वाढेल तस तसा प्रत्येक जण विकासाचे अधिकाधिक मुद्दे जनताजनार्दनासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मात्र जनता कोणाच्या पारड्यात मत टाकणार? हे मात्र मतमोजणी नंतरच समजणार आहे . विशेष म्हणजे निमगाव मधील एकमेकांविरोधात ग्रामपंचायत लढविणारे दोन्ही गट हे भारतीय जनता पार्टीचेच आहेत.