माळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

माळशिरस विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अकलूजला / निवडणुक निर्णय अधिकारी विजया पांगारकर

भूमीपुत्र न्यूज

अनेक वर्षांपासुन माळशिरस येथे मतमोजणी होत होती. परंतु गोडावूनमधील जागेची कमतरता, सुरक्षेचा प्रश्न व इतर कारणांमुळे येत्या विधानसभा मतमोजणी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या वखार महामंडळाच्या 3 गोडावूनमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी अकलूज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

माळशिरसमध्ये होणारी मतमोजणी इतरत्र हलवू नये याकरीता माळशिरस शहर बंद सह अनेकांनी याला तिव्र विरोध केला होता. परंतु मतमोजणीची होणारी अडचण लक्षात घेता अकलूजला मतमोजणी करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध असल्याने मतमोजणी स्ट्राँग रूम अकलूजला हलविण्यात आली आहे. ३४५, अ. जा. माळशिरस तालुका विधानसभा मतदार संघामध्ये दि. १६ ऑक्टोंबर २०२४ अखेर १ लाख ७९ हजार ५५८ पुरुष, १ लाख ६८ हजार १९७ स्त्री, इतर ३२ असे एकूण ३ लाख ४७ हजसा ७८७ मतदार आहेत. यामध्ये ४०६ सैनिक मतदारही सामिल आहेत. एकूण ३४५ मतदान केंद्रांमधील जाधववाडी ११०, पानीव १६८ नविन क्रमांक १७०, वेळापूर २९६ नविन क्र. ३०१, तांदुळवाडी ३२५, ३२६, ३२७ नविन क्र. ३३१, ३३२, ३३३ अशा ६ मतदान केंद्रांच्या नावात बदल करण्यात आला आहे. तर देशमुखवाडी ४, पठाणवस्ती-वाणीवाडी २०३ नविन क्र. २०५, दसुर ३३४ नविन क्र. ३४० अशा ४ मतदान केंद्राच्या स्थानात बदल करण्यात आला आहे. माळशिरस १३७, १४२ मगरवाडी २०७, सुळेवाडी २१०, अकलूज-दत्तनगर २७१, काळमवाडी ३१५ व उघडेवाडी ३४५ अशी ७ नविन मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. कुरबावी ६ व ७, डोंबाळवाडी ८ व ९, कारूंडे १७ व १८, एकशिव २८ व २९, फोंडशिरस ७०,७१,७२,७५ व ७७, नातेपुते ४७,५२,५३,५४,५८,५९,६०, फडतरी ८१,८२, मांडवे ८९,९०, सदाशिवनगर १०५,१०६, माळशिरस१३५,१३६,१३७,१३८,१३९,१४०,१४२,१४४,१४५, तिरवंडी १२७,१२९, तरंगपळ १६४,१६५, यशवंतनगर १८२,१८५, सुळेवाडी २०५२,२०६, पिलीव २०७,२०९,२१०,२१२, पिसेवाडी २२३, माळेवाडी-अकलूज २३०,१३१, अकलूज २४८,२४९,२६५, संग्रामनगर २६०,२६१,२६३,२६४, तांबवे २७७, २७९, वेळापूर२९३२९४, २९७,३००, कोळेगाव ३१६,३१७,३१८, तांदुळवाडी ३२२,३२४, धानोरे ३२९,३३०, उघडेवाडी ३३७४,३३८, दसुर ३३३,३३४ अशी एकूण ७७ मतदान केंद्रे विलिन करण्यात आली आहेत. याची माळशिरस तालुक्यातील मतदारांनी नोंद घ्यावी. अजुनही कोणाचे नविन मतदान नोंदणी करणे राहीले असेल तर त्यांनी करून घ्यावे असे आवाहन डॉ. विजया पांगारकर यांनी केले. यावेळी तहसिलदार सुरेश शेजुळ उपस्थित होते.

सर्व राजकीय पक्षांची बैठक घेऊन संमती नंतरच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उपलब्ध जागा व सुरक्षिततेच्या कारणास्तव अकलूज मधूनच कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव पाठविल्यानंतरच निवडणुकींची प्रक्रिया अकलूज मधूनच कार्यान्वित असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!