माळशिरस तालुकाशैक्षणिकसांस्कृतिक

चांदापूरी जि प प्राथमिक शाळेतील स्नेहसंमेलन उत्साहात

भूमीपुत्र न्यूज/रशिद शेख

चांदापुरी जि प प्रा केंद्र शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन 27 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले चांदापुरीचे नुतन सरपंच जयवंत सुळ, उपसरपंच तात्यासो चोरमले, युवा नेते विजयसिंह पाटील आदी मान्यवरांच्या शुभहस्ते फीत कापुन , विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पुजन ,दीपप्रज्वलन आणि रंगमंचाचे पुजन करण्यात आले .

शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी विविध कलागुण यामध्ये शेतकरी नृत्य,लावणी नृत्य,देशभक्तीपर गीते , भक्ती गीते ,विनोदी नाटक ,असे विविध कलाविष्कार सादर करुन प्रेक्षकांची वाहवा मिळवली .

यावेळी केंद्रप्रमुख राजु गोरवे , सत्यजित बनकर ,बापुसाहेब चंदनशिवे ,नुतन ग्रामपंचायत सदस्या सविता पाटील , प्रियंका सरक , दिपाली निकम ,नुतन सदस्य अजित लोखंडे ,आप्पा शिंदे ,हनुमंत सरतापे , माजी सरपंच भजनदास चोरमले ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय कोपनर, उपाध्यक्ष संतोष सरक दिपक कोपनर युवानेते शाहिद शेख विकास कोळपे ,आप्पा पाटील, शिवाजी पाटील ,अनिल मगर मुनीर शेख, प्रमोद मगर , शिवाजी गोरवे , बापु लोखंडे ,बाबा पुकळे ,बाळु पाटोळे ,प्रकाश शिंदे ,प्रदिप लाडे ,पत्रकार अभि तावरे ,दामोदर लोखंडे ,संजय पाटील ,रशिद शेख आदी मान्यवर ग्रामस्थ महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजु गोरवे तर आभारप्रदर्शन सत्यजित बनकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!