अजब प्रकार …माळशिरसच्या बीडीओंना घरात घुसून मारहाण
भूमीपुत्र न्यूज
अमोल पाटील नामक गृहस्थ सोलापूर जिल्हा परिषदेअंतर्गत माळशिरस पंचायत समिती कार्यालयात सेवेत असून त्यांना नेमून दिलेली कामे ते व्यवस्थित करीत नाहीत या कारणामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सेवेतून कमी केले होते हा राग मनात धरून अमोल पाटील यांनी माळशिरस चे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्यामुळेच माझी नोकरी गेली असा राग मनात धरून माळशिरसचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांना त्यांच्या राहत्या घरात घुसून मारहाण केली.
कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून गटविकास अधिकारी यांच्या घरात घुसून काठीने मारहाण करून खिशातील 5000 रोकड जबरदस्तीने काढून घेऊन जीवे मारण्याची धमकी माळशिरसच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिली असून ही घटना 12 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 7.10 मिनिटांच्या सुमारास माळशिरस येथील पंचायत समिती वसाहतीत घडली आहे अमोल पाटील याच्या विरोधात माळशिरस पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .