कोळेगांव येथील सिद्धनाथ गणेश तरुण मंडळास द्वितीय क्रमांक
वेळापूरचे पोलीस उपनिरीक्षक निलेश बागाव यांच्या हस्ते दिले प्रशस्तीपत्र
भूमीपुत्र न्यूज /सतीश पारसे,कोळेगांव
वेळापूर पोलीस स्टेशनच्या वतीने वेळापूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील गणेश मंडळांसाठी आकर्षक सजावट ,राबविण्यात येणारे सामाजिक उपक्रम आदी विविध गोष्टींचे परीक्षण करून बक्षीस पात्र गणेश मंडळास प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येते सन 2018 -19 च्या स्पर्धेत सिद्धनाथ गणेश तरुण मंडळ पारसेनगर, कोळेगाव या मंडळास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक व सन्मानचिन्ह वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निलेश बागाव यांच्या हस्ते देण्यात आले यावेळेस हे प्रशस्तीपत्र सिद्धनाथ गणेश तरुण मंडळाचे नारायण पारसे यांनी स्वीकारले .
वेळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विविध गणेश मंडळास यावेळी वेळापूर येथे समारंभपूर्वक प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देण्यात आले सन 2018- 19 नंतर कोविडच्या परिस्थितीमुळे या स्पर्धा घेण्यात आल्या नव्हत्या मात्र यावर्षी सन 2023 ला या स्पर्धा पुन्हा वेळापूर पोलीस स्टेशनच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आले असून यामध्ये वेळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील गणेश मंडळांनी सहभाग नोंदविला आहे सिद्धनाथ गणेश तरुण मंडळाची स्थापना सन 2012 साली झाली असून आत्तापर्यंत या मंडळांने रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य शिबिर, गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप याचबरोबर महिलां-भगिनींसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत .यासाठी मंडळाचे अध्यक्ष दिनेश पारसे, शहाजी पारसे, चंद्रशेखर पारसे, लक्ष्मण पारसे, सतीश पारसे, उत्तरेश्वर पारसे, सोमनाथ पारसे नारायण पारसे आदी पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.
वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निलेश बागाव यांनी आवाहन केल्यानुसार यावर्षीचा गणेशोत्सव हा विविध सामाजिक उपक्रम राबवून सिद्धनाथ गणेश तरुण मंडळ साजरा करणार तर आहेच परंतु याचबरोबर डॉल्बीमुक्त गणेश उत्सव साजरा करून याही वर्षीच्या स्पर्धेत आमचे मंडळ बक्षीस मिळवेल .
दिनेश पारसे, अध्यक्ष सिद्धनाथ गणेश तरुण मंडळ पारसेनगर ,कोळेगाव