मरीआई / देऊळवाले समाजासाठी माळशिरस महसूल प्रशासनाच्या वतीने विशेष शिबिराचे आयोजन
भूमीपुत्र न्यूज
महसूल प्रशासन व नगर परिषद अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने अकलूज येथील मरीआई व देऊळवाले समाजासाठी विशेष मतदार नोंदणी अभियान शुक्रवार दि 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजता होणार असून याचबरोबर उपजिल्हा रुग्णालय अकलूज यांच्या विशेष सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज या ठिकाणी शिबिर आयोजित केले असल्याची माहिती अकलूजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी प्रसिद्ध पत्रकारद्वारे दिली.
मरीआई /देऊळवाले या समाजातील लोकांसाठी तहसील कार्यालयाच्या वतीने आधार नोंदणी, नवीन रेशन कार्ड, युनिट कमी जास्त करणे ,संजय गांधी योजनेसाठी लाभार्थी शोधण्यात येणार आहेत तसेच उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग व अकलूज कार्यालयाच्या वतीने जातींच्या दाखल्यासाठी विशेष शिबिर घेण्यात येणार आहे उपजिल्हा रुग्णालय यांच्या वतीने वैद्यकीय शिबिरात आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे नगरपरिषद अकलूज यांच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहिण व वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत मरीआई / देऊळ वाले समाजासाठी वरील सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी देण्यासाठी सभागृह, जिल्हा क्रीडा संकुल अकलूज येथे सकाळी 10 ते 1 या वेळेत शिबिर घेण्यात येणार आहे या शिबिराचा लाभ मरीआई/ देऊळ वाले समाजातील लाभधारकांनी घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी केले आहे.