डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांनी आ. राम सातपुते कुटुंबीयांचे केले सांत्वन
भूमीपुत्र न्यूज
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी माळशिरस विधानसभेचे सदस्य आ राम सातपुते यांच्या मातोश्रींच्या निधनानंतर आ सातपुते यांच्या मांडवे ता माळशिरस येथील श्रीराम निवासस्थानी जाऊन आ राम सातपुते यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब इनामदार, काँग्रेसचे माळशिरस तालुकाध्यक्ष सतीश पालकर,विकास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .
सोमवार दि 26 जून रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व आ राम सातपुते यांच्या मातोश्री जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे वयाच्या 74 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले होते त्यांच्या मूळ गावी डोईठाण ता आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले डोईठाण येथे सर्व विधी पूर्ण केल्यानंतर आमदार सातपुते हे डोईठाण येथून मांडवे ता माळशिरस येथे आपल्या निवासस्थानी शुक्रवार दि 30 जून रोजी आल्यानंतर महाराष्ट्रासह तालुक्यातील अनेक मान्यवरांनी आ राम सातपुते यांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले रविवार दि 2 जुलै रोजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनीही आ राम सातपुते यांच्या मांडवे येथील निवासस्थानी जाऊन सातपुते कुटुंबीयांची भेट घेऊन स्व. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व या दुःखातून सातपुते कुटुंबीयांना सावरण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना केली .