संत गाडगे बाबा जयंतीनिमीत्त चांदापुरीत ग्रामस्वच्छता अभियान
भूमिपुत्र न्यूज/रशिद शेख, चांदापुरी
संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त चांदापुरी ता माळशिरस ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला.गेल्या वीस वर्षापासुन वेडी बाभळीच्या चिलारीने गावाला वेडले होते. लोकांना येता-जाता या काटेरी झुडपांचा त्रास होत होता ही अडचण लक्षात घेऊन जेसीबी मशिनद्वारे गावातील चिलार, काटेरी झुडपे काढण्याचा शुभारंभ शनिवार दि 18 रोजी करण्यात आला यावेळी जेसीबी मशीन चे पूजन चांदापुरीचे सरपंच जयवंत सुळ यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी उपसरपंच तात्यासो चोरमले, विजय पाटील शाहिद शेख , ग्रामपंचायत सदस्य अजित लोखंडे , संतोष सरक , मुनिर शेख , शिवाजी गोरवे , विठ्ठल सरक , सुभाष जगदाळे ,गुरव नवनाथ कोळेकर , बलभिम जगदाळे, पिंकल तुपे , शंकर कवळे , दिपक कोपनर , आण्णा लोखंडे, कोतवाल बाळु पाटोळे , विजय निकम ,प्रकाश शिंदे , मोहन सरतापे ,दादा पांढरे ,हनुमंत लोखंडे ,प्रदिप लाडे , हनुमंत कोपनर , आप्पा पाटील , शिवाजी पाटील ,प्रमोद मगर ,जयंत कोपनर आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते .