क्रीडामाळशिरस तालुकाशैक्षणिक

राष्ट्रीय सेवा योजनाच्या उपक्रमातून युवकांनी आपला व्यक्तीमत्व विकास घडवावा/पो.नि.दिपरतन गायकवाड

भूमीपुत्र न्यूज

काॅलेजच्या जीवनात युवकांनी अभ्यासाबरोबर विविध उपक्रमात सहभागी होऊन आपला सर्वांगीण विकास व स्वतःचा व्यक्तीमत्व विकास करावा असे माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी सांगितले ते अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या चाकोरे ता माळशिरस येथील राष्ट्रीय सेवा योजनाचे विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे होते.

यावेळी चाकोरे गावचे सरपंच नवनाथ जाधव,उपसरपंच सचिन कचरे,माजी सरपंच चंद्रकांत शिंदे ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील, तिरवंडी गावचे सरपंच नानासाहेब वाघमोडे,रोटरी क्लबचे अध्यक्ष दिपक फडे,सचिव केतन बोरावके,मोहन गायकवाड,जि.प.शाळा मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे,दादा आरडे,किरण भांगे,धुळदेव वाघमोडे,बीट अंमलदार बोराटे व गायकवाड,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,अकलूज केंद्राचे समन्वयक डॉ.बाळासाहेब मुळीक सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉ.चंकेश्वर
लोंढे,कार्यक्रमाधिकारी डॉ.दत्तात्रय मगर,डॉ.सज्जन पवार,डॉ.सविता सातपुते, प्रा.विजयकुमार शिंदे,कनिष्ठ महाविद्यालय विभागप्रमुख राजकुमार इंगोले,कनिष्ठ महाविद्यालय कार्यक्रमाधिकारी प्रा.बलभिम काकुळे ,खराडे सर,वाघ सर,मिले मॅडम,नलवडे सर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. दत्तात्रय मगर ,आभार डॉ.सज्जन पवार व सूत्रसंचालन अनिल पराडे सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवका व स्वयंसेविका परिश्रम घेतले.सायंकाळी राहुल वाघमोडे यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलीत करून स्वयंसेवकांनी गावातून मशालफेरी काढली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!