माळशिरस तालुकाराजकिय

संगम ग्रामपंचायतीच्या उमेदवार जयश्री इंगळे यांनी मानले मतदारांचे आभार

भूमीपुत्र न्यूज

संगम ता माळशिरस येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक रविवार दिनांक 18 डिसेंबर रोजी पार पडली असून या निवडणुकीमध्ये युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांच्या सुविद्य पत्नी जयश्री इंगळे या ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणुकीसाठी उभ्या होत्या संगम गावची निवडणूक कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीतपणे पार पडले असून जयश्री इंगळे यांनी मतदान झाल्यानंतर लागलीच प्रभाग क्रमांक तीन मधील सर्व मतदारांकडे जाऊन त्यांचे आभार मानले.

याचबरोबर सर्व मतदारांनी लोकशाहीतील आपला महत्त्वपूर्ण हक्क बजाविल्याबद्दल त्यांना गुलाब पुष्प देऊन सर्व मतदारांचे आभार मानले जयश्री इंगळे यांनी केलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून निवडणुकीमध्ये जय पराजय हा होतच असतो परंतु अलीकडच्या काळामध्ये मतदानापासून परावर्त होत चाललेला सर्व वर्ग पुन्हा एकदा मतदानाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी जयश्री इंगळे यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे संगम गावच्या एकूण 1944 मतदानापैकी 1723 एवढे मतदान झाले असून वार्ड क्रमांक 3 मधे 734 पैकी 668 मतदान झाले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!