माळशिरस तालुकासामाजिक
वेळापूरचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सत्कार
भूमीपुत्र न्यूज
वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांची अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागी कोल्हापूर परिक्षेत्र या ठिकाणाहून आलेले नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब चंद्रकांत गोसावी यांनी वेळापुर पोलिस स्टेशनचा पदभार नुकताच स्वीकारला.
याबद्दल माळशिरस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक मगन काळे,रायचंद खाडे,जब्बार आतार,डॉ सचिन शेंडगे, तालुकाध्यक्ष अजित बोरकर, अमरसिंह माने-देशमुख, वंचित चे प्रदीप सरवदे,रूपचंद खाडे,राजेश खरात,दादा काळे,प्रदीप ठवरे, महेश चव्हाण ,सोमेश्वर राजगे यासह पदाधिकारी उपस्थित होते.