बार्शीची सुकन्या सृष्टी राजेश मुकणे मिस टीन 2024 ची सोलापूरची मानकरी
भूमीपुत्र न्यूज
सृष्टी राजेश मुकणे या बार्शीच्या सुकन्याने सोलापूर जिल्ह्याचे नाव संपूर्ण भारतभर करून देशभरातून सहभागी झालेल्या पाच हजार मुलींमधून देशभरातून दोनशे मुलींची निवड राजस्थान, जयपुर या ठिकाणी करण्यात आली यामध्ये सोलापूर जिल्ह्याची 2024 ची मिस टीन होण्याचा बहुमान सृष्टी मुकणे हिने मिळविला व तिची निवड देशभरातून सहभागी झालेल्या पाच हजार मुलींमधून दोनशे मुलींमध्ये करण्यात आल्याने सृष्टीच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अठरा वर्ष वयाखालील मुलींच्या स्पर्धा या मिस युनिव्हर्स व मिस वर्ल्ड या धरतीवर देशात घेतल्या जातात या अनुषंगाने फोरएव्हर स्टार इंडियाने 6 ते 8 सप्टेंबर 2024 या कालावधीत राजस्थान जयपूर येथे फॉरएव्हर मिस, मिसेस आणि मिस टीन 2024 साठी सिटी क्राउनिंग या भव्य सौंदर्य स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत देशभरातील विविध शहरातील मॉडेल्सना विविध श्रेणीमध्ये मुकुट देण्यात आला मिस टीन आणि मिसेस इंडियाज सिटी ग्रुप सृष्टी राजेश मुकणे हिने फॉर एव्हर मिस टीन सोलापूर सिटी 2024 चे विजेतेपद पटकविले यामुळे तिला आता विविध व्यासपीठांवर आपल्या शहराचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
संपूर्ण देशभरांमधून ज्या 200 मुलींचे निवड झाली आहे त्यामधून एका मिस टीन ची निवड होण्यासाठी डिसेंबर 2024 मध्ये ग्रँड फिनाले होणार आहे यामुळे सर्व स्पर्धक उत्सुकतेने आगामी टप्प्यासाठी तयारी करीत आहेत या स्पर्धेचा0 हा चौथा सीजन असून यामध्ये देशभरातील निवडक मॉडेल सहभागी होतात आणि स्वतःला सक्षम बनवितात.
मिस टीन सोलापूर 2024 बनणे हा सृष्टीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असून एक उत्तम अभिनेत्री आणि के – पॉप आयडॉल बनण्याची तिची महत्त्वकांक्षा असून लहान वय असूनही इतरांना प्रेरणा देण्याची तिची जिज्ञासू वृत्ती आहे मनोरंजनाकडे तिचा कल असून आपण लिहिलेल्या कथेवर चित्रपट निर्माण व्हावा या अपेक्षा असून हरण्या नावाचा मराठी सिनेमा लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असून ती यामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे ग्रामीण भागातील मुली या क्षेत्राकडे वळत आहे व त्यामध्ये आपले नैपुण्य दाखवत आहेत .