शिवजयंती निमित्त अकलूज व वाघोली येथे ॲड वैशाली डोळस-आहेर यांचे व्याख्यान
मराठा सेवा संघ ,जिजाऊ ब्रिगेड , संभाजी ब्रिगेड व अकलूज नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने
भूमीपुत्र न्यूज
कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त अकलूज ,जयशंकर उद्यान येथे रविवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.00 वा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्यात्या ॲड वैशाली डोळस- आहेर यांचे “छत्रपती शिवराय” या विषयावर व्याख्यान होणार असून याच विषयावर 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.00 वा वाघोली येथील शिवजयंती जन्मोत्सव समितीच्या वतीने ही व्याख्यान आयोजित केले आहे अकलूज येथे होणारा हा कार्यक्रम मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व अकलूज नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती मराठा सेवा संघाच्या वतीने देण्यात आली .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, शिवामृत चे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील ,अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, यासह अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे ,अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर ,मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने शेंडगे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रांतिक सदस्य अक्काताई माने, मराठा सेवा संघाचे माळशिरस तालुकाध्यक्ष डॉ. रामचंद्र मोहिते यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तरी अकलूज आणि परिसरातील सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे .
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर दोन वर्षानंतरच प्रथमच शिवजयंती मोठ्या स्वरूपात साजरी होत असून शिवजयंती निमित्त माळशिरस तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शनिवार दि 18 रोजी सायंकाळी 7.00 वा जय शंकर उद्यान अकलूज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर दीप प्रज्वलन करून रोषणाई करण्यात येणार आहे