वेळापुर येथे महाशिवरात्री निमित्त ॲड मगर यांचे हस्ते शंभू महादेवाची पूजा
भूमीपुत्र न्यूज
वेळापुर ता माळशिरस येथील सुर्यकांत मिरगे व भैय्या मिरगे यांनी बांधलेल्या महादेव मंदिरात आपला युवक शेतकरी फोरम चे मुख्य प्रवर्तक, अध्यक्ष ॲड एम एम मगर यांचे हस्ते विधीवत पुजा करण्यात आली यावेळी सदगुरू मुक्तेश्वर शिवाचार्य महाराज यांनी मंत्रोच्चार करुन विधी पुर्वक पुजा केली.
वेळापुर येथे मिरगे कुटुंबीयांनी महादेवाचे भव्य मंदिर उभा केले आहे. दर वर्षी या ठिकाणी महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो. या वर्षी ही या उत्सवाचे व महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी ॲड मगर यांचे हस्ते महाशिवरात्री पुजा करण्यात आली. कार्यक्रमासाठी महेश स्वामी, वैभव स्वामी,ओम स्वामी,भैय्या मिरगे, सुर्यकांत मिरगे,ज्ञान देशपांडे,वामन वाघमोडे,राम मस्के,संजय देशमुख,अमृत माने देशमुख, प्रकाश ताटे, राजकुमार टंगचाळे, सह्याद्री प्रतिष्ठान वेळापुर, अमृत भैय्या मित्र मंडळ वेळापुर असे विविध क्षेत्रातील मान्यवर व भावीक हजर होते. शंभु महादेवाच्या जयजयकारने या उत्सवाची सुरुवात झाली व महाप्रसादा ने सांगता झाली. यावेळी आपला युवक शेतकरी फोरम चे पुर्ण सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन ॲड मगर यांनी दिले.