अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 18 जागेसाठी 81 उमेदवारी अर्ज दाखल
भूमीपुत्र न्यूज
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 18 जागांसाठी सत्ताधारी मोहिते पाटील गटासह विरोधी गटाकडून 81 उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 3 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले आहेत ही निवडणूक दुरंगी होणार असून सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या विरोधात डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली मविआने मोट बांधत विरोधी गट निवडणुक लढवित आहे.
निवडणुक निर्णय अधिकारी एम एल शिंदे यांच्या अधिपत्याखाली ही निवडणूक होत असून या निवडणुकीत 27 मार्च पासुन अर्ज दाखल करण्यात येत होते विद्यमान सभापती मदनसिंह मोहिते पाटील,बाबाराजे देशमुख,पदमजादेवी मोहिते पाटील,उत्तम जानकर, या दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.या निवडणुकीत सहकारी मतदार संघातील सर्वसाधारण 7 जागेसाठी 32 अर्ज,महिला राखीव 2 जागेसाठी 8 अर्ज,इतर मागासवर्ग 1 जागेसाठी 6 अर्ज,भटक्या विमुक्त जाती जमाती वर्ग 1 जागेसाठी 6 अर्ज,ग्रामपंचायत मतदार संघात सर्वसाधारण 2 जागे साठी 11 अर्ज,अनुसुचित जातीजमाती वर्ग जागेसाठी 5 अर्ज,अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1 जागेसाठी 5 अर्ज, व्यापारी मतदार संघात 2 जागेसाठी 6 अर्ज व हमाल तोलारी 1 जागेसाठी 4 अर्ज असे एकुण 18 जागेसाठी 81 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
सहकारी मतदार संघातून सर्वसाधारणासाठी, पद्मजादेवी मोहिते पाटील, मदनसिंह मोहित पाटील,मारुतराव रुपनवर,शिवाजी चव्हाण,नितीन सावंत,शहाजीराव देशमुख,बाबुराव कदम ,बाळासो माने देशमुख,रामचंद्र गायकवाड,मालोजीराजे देशमुख, श्रीनिवास कदम पाटील, नागेश काकडे,रणजितसिंह देशमुख,उत्तम जानकर,बाळासाहेब सावंत,मधुकर वाघमोडे,राहुल सावंत,गणेश इंगळे,पांडुरंग पिसे,पांडुरंग वाघमोडे,अजित बोरकर,राजेंद्र वााळेकर, दादासाहेब लाटे,शरद पाटील,लक्ष्मण पवार,महिला राखीव गटात मेघा साळुंखे,अमृता सुरवसे,रोहिणी खराडे, पदमजादेवी मोहिते पाटील,शोभा कागदे,सोनाली पाटील, इतर मागासवर्ग गटात भानुदास राऊत,दत्तात्रय पिसे,भिमराव फुले,उत्तम बरडकर,पोपट बोराटे, विमुक्त जाती/भटक्या जमाती गटात संदिप पाटील,विश्वजीत पाटील,अंबादास ओरसे,अजित बोरकर, ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटात बापुराव पांढरे,लक्ष्मण पवार,विष्णु घाडगे,श्रीनिवास कदम पाटील,पदमजादेवी मोहिते पाटील,केशवराव पाटील,तानाजी जगदाळे, शहाजीराव देशमुख, अनुसूचित जाती जमाती गटात दत्ताराम लोखंडे,रामचंद्र डावरे,उत्तम जानकर,मिलिंद सरतापे, अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटात पोपट भोसले,यशवंतराव घाडगे,रामचंद्र गोडसे,राहुल सावंत, व्यापारी मतदार संघात आनंद फडे,महावीर गांधी, मोहसीन बागवान,दिपक गरड,हमाल तोलार मतदार संघात उध्दव डांगरे,रविंद्र भोसले,संजय कोळेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
या निवडणुकीत नामनिर्देशन पत्र छाननी 5 एप्रिल 2023 रोजी, वैद्य नामनिर्देशन पत्र जाहिर करणे 6 एप्रिल 2023 रोजी, 6 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023 पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेणे ,21 एप्रिल 2023 रोजी चिन्ह वाटप ,28 एप्रिल 2023 रोजी मतदान व 29 एप्रिल 2023 रोजी मतमोजणी व निर्णय