महाराष्ट्रमाळशिरस तालुकाराजकिय

आ राम सातपुते यांच्या समर्थनार्थ नगर जिल्ह्यात हिंदू संघटना रस्त्यावर

भूमीपुत्र न्यूज

नगर जिल्ह्यातील ब्राह्मणी गावात हिंदूंचे जबरदस्तीने होणारे धर्मांतर बाबतचे प्रकरण उघड झाल्यानंतर माळशिरसचे आ राम सातपुते यांनी विधानसभेत 24 डिसेंबर 2022 रोजी विधानसभेत या प्रकाराबाबत आवाज उठविला व अशा जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे अवाहन केल्यानंतर राहुरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या या ब्राह्मणी गावातील धर्मांतरावर डोळे झाक करणाऱ्या पोलीस निरीक्षक दराडे यांची शासनाने तात्काळ बदली केली व कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

हिंदूंचे जबरदस्तीने होणारे धर्मांतर तात्काळ थांबवावे या माळशिरसचे आ राम सातपुते यांच्या मागणीनुसार कर्तव्यात कसूर केल्याबद्दल राहुरीचे पोलीस निरीक्षक दराडे यांची बदली तर झालीच पण यानंतर नगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून आ. राम सातपुते यांना अनेकांचे आभाराचे फोन आले याचबरोबर जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत आ राम सातपुते यांच्या समर्थनार्थ नगर जिल्ह्यात रॅली काढण्यात आली
याबद्दल आ. राम सातपुते यांनी या भागातील सर्वांचेच मनःपूर्वक आभार मानले असून धर्मरक्षा हे माझं कर्तव्य होतं, आहे आणि राहील! यापुढेही धर्मांतर बंदीचा कायदा होईपर्यंत आपला हा लढा असाच सुरू राहील असे आ. राम सातपुते यांनी सांगितले

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!