जागतिक दिव्यांग दिनानिमित्त तरंगफळ येथे विविध उपक्रमांचे आयोजन
शारीरिक अपंगत्वापेक्षा मानसिक अपंगत्व धोकादायक / हरिश्चंद्र मगर
भूमीपुत्र न्यूज
सध्याच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनामध्ये वेळेचं फार महत्त्व आहे परंतु अलीकडच्या कालावधीत पालकांचे आपल्या पाल्यावर असणारे लक्ष कमी होत चालले आहे यामुळे शारीरिक अपंगत्वापेक्षा मानसिक अपंगत्व धोकादायक असल्याचे मत शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाचे संचालक हरिश्चंद्र मगर यांनी तरंगफळ येथे व्यक्त केले . 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त तरंगफळ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी विचारपीठावर स्व.राजमाता रत्नप्रभादेवी मोहीते पाटील बहुउद्देशीय अपंग संस्थेचे माळशिरस तालुकाध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक गोरख जानकर, माळशिरसचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे ,सरपंच पद्मिनी तरंगे, उपसरपंच पांडुरंग कांबळे, शिवामृतचे संचालक संग्रामसिंह रणनवरे ,महादेव तरंगे ,शशिकांत साळवे ,सागर बोडरे, सुजीत तरंगे, जगुबाई जानकर, विलास तरंगे, केशव तरंगे ग्रामसेवक संतोष पानसरे, ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत नायकुडे, माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते .तरंगफळ येथे 25 दिव्यांग बांधवांची नोंद असून यावेळी तरंगफळ ग्रामपंचायतीच्या वतीने चिंगाबाई साळवे व तुकाराम कांबळे या दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात येणाऱ्या पाच टक्के निधीच्या माध्यमातून 5 हजार रुपये रकमेचे धनादेश विचारपीठावरील मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले तर जगूबाई गेंड या वयोवृद्ध दिव्यांग महिलेचा यावेळी सन्मान करण्यात आला.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त तालुकाध्यक्ष गोरख जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली तरंगफळ येथे आधार कार्ड कॅम्प आयोजित करण्यात आला होता या कॅम्पमध्ये नवीन आधार कार्ड कार्ड काढणे, आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करणे, फोटो बदलणे , चुकलेले नाव दुरुस्त करणे आदी विविध सोयी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या याचबरोबर भारतीय टपाल कार्यालयाच्या वतीने रुपये 396 /-ची रक्कम भरल्यानंतर पोस्ट कार्यालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध सुविधांची माहिती देण्यात आली तर तरंगफळ येथील शालेय विद्यार्थ्यांना खाऊवाटप व शालेय साहित्यांचे वाटप यावेळी करण्यात आले यावेळी माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, शिवामृतचे संचालक संग्रामसिंह रणनवरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजित तरंगे यांनी करून सर्वांचे स्वागत केले सूत्रसंचालन संतोष पानसरे तर आभार गोरख जानकर यांनी मानले.