माळशिरस तालुका

वेळापूर पोलीसांची दमदार कामगिरी; घर पाळत ठेवून चोरी केलेल्या आरोपीस पकडून लॅपटॉप व मोबाईल केले हस्तगत

भूमीपुत्र न्यूज

माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील फिर्यादीचे उघडे घरात कोणीतरी अज्ञात इसमाने प्रवेश करून घरातील लॅपटॉप, मोबाईल चोरी करून घेवून गेले बाबत वेळापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर १२८/२०२४ भा.द.वि. कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार संदीप पाटील हे करीत असताना गोपनिय बातमीदारामार्फत मिळाले बातमीवरून व तांत्रिक तपासावरून इसम अक्षय सिटर भोसले रा. पिटकेश्वर ता. इंदापूर यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेवून तपास करून त्याचेकडून चोरीस गेलेला लॅपटॉप व मोबाईल हस्तगत करून सदर आरोपीस गुन्ह्याचे कामी वेळापूर पोलिसांनी अटक केले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रितम यावलकर, उपविभागिय पोलीस अधिकारी अकलुज उपविभाग अकलुज श्री. नारायण शिरगावकर व वेळापूर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सपोनि/श्री. भाउसाहेब गोसावी, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस हवालदार संदीप पाटील, पोशि/हर्षद ठाकर, दिपक नवले यांनी बजावली आहे.याबाबत वेळापूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

अकलुज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात वेळापुर येथील लॅपटॉप व मोबाईल चोरी प्रकरणातील लॅपटॉप व मोबाईल उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांच्या हस्ते फिर्यादीस देण्यात आला.यावेळी वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी, पोलीस कर्मचारी संदीप पाटील, डॉ.चौगुले उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!