माळशिरस तालुक्यात एकाच दिवशी पार पडल्या 96 बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
भूमीपुत्र न्यूज
माळशिरस तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गुरुवार दिनांक 27 एप्रिल रोजी आयोजित बिना टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरामध्ये एकूण 96 यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या . सोलापूर येथील सर्जन डॉ.केरू खरे यांनी या सर्व शस्त्रक्रिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडल्या.
वेळापूर आरोग्य केंद्रामध्ये 36, माळीनगर येथे 33 व शंकरनगर येथे 27 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सदरची शस्त्रक्रिया शिबिरे विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात महिन्यातून राबविली जातात. सध्या सुट्टीचे दिवस असल्यामुळे या शिबीराला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे . शस्त्रक्रिया करीत असताना योग्य ती काळजी घेऊन उत्तमरीत्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जात आहेत .राष्ट्रीय लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम हा आरोग्य विभागाचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. सदरची शिबिरे यशस्वी पार पाडण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले .