अनुभवसिद्ध ज्ञान हा विज्ञानाचा पाया आहे /.प्रा. विष्णू सुर्वे
भूमीपुत्र न्यूज/ संजय लोहोकरे
विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवी जीवनासाठी अत्यावश्यक आहे. तसेच उत्सुकता,जिज्ञासा व चिकित्सा ही विज्ञानाची त्रिसूत्री आहे.वैज्ञानिकांमुळे मानवी जीवन समृद्ध झाले आहे.आपण त्यांच्या बद्दल नेहमी कृतज्ञ असले पाहिजे,विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे व आपले आदर्श बदलण्याचे आवाहन प्रा विष्णू सुर्वे यांनी केले. ते अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये विज्ञान मंडळ,रसायनशास्त्र विभाग अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला,यावेळी बोलत होते.
यावेळी अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे यांनी विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवण्याचे व चिकित्सक बुद्धीने नवनिर्मिती करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.यावेळी रसायनशास्त्र विभागातर्फे आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल श्रीमती डॉ.डी.आर. कांबळे यांनी जाहीर केला. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बागडे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रा.आर.एच.कुंभार,डॉ.एस.यु.शिंदे,डॉ.एस.के.टिळेकर,डॉ.सी.एस.पवार,डॉ.एस.एम.सातपुते,डॉ.ए.आर.बाबर,प्रा.ए.एस.रेळेकर,प्रा.राहणे,डॉ.सी.व्ही.ताटे देशमुख,डॉ.पी.एम.खराडे,जितेंद्र बाजारे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एस.एस.देवकर यांनी केले.प्रा.कु.वसेकर यांनी आभार मानदे , सूत्रसंचालन बी.एस्सी.भाग ३ ची विद्यार्थिनी ऋतुजा कदम हिने केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.यु.जे. वाघमोडे, प्रा.आर.ए.सुर्वे, बी.एस्सी.भाग 3 मधील सर्व विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.