माळशिरस तालुकाराजकिय

निमगावातील महत्वपूर्ण दोन पराभव दोन्ही गटाच्या जिव्हारी….

मनीषा मधुकर साठे यांना सर्वाधिक मताधिक्य

भूमीपुत्र न्यूज

6284 मतदार संख्या असलेल्या निमगाव ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीत 5204 मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजाविला निमगावातील दोन्ही पारंपारिक विरोधी गट एकमेकांच्या विरोधात लढत देत होते मतदाना अगोदर , मतदानानंतर आणि निकालापूर्वी दोन्ही गटाकडून विजयाचे दावे,प्रतिदावे केले जात होते मात्र प्रत्यक्षात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सहप्रभारी व निमगाव ग्रामविकास आघाडीचे पॅनल प्रमुख के के पाटील यांच्या गटाने निमगाव ग्रामपंचायतची सत्ता 12 +1 या फरकाने काबीज केली आहे.

निमगाव ग्रामविकास आघाडीने सत्ता जरी काबीज केली असली तरी प्रभाग क्रमांक 3 मधून उभे असलेले उमेदवार विकास श्रीमंत मगर यांचा अवघ्या 1 मताने झालेला पराभव हा निमगाव ग्रामविकास आघाडीच्या जिव्हारी लागला आहे याचबरोबर गेली पाच वर्षे निमगावचा कारभारी म्हणून ज्यांनी कार्यभार सांभाळला होता त्या सहकार महर्षी पॅनलच्या उमेदवार व माजी सरपंच आरती विष्णुपंत मगर यांना त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या प्रभागात 107 मताने पराभवाला सामोरे जावे लागले यामुळे आपल्या हक्काच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि हाही पराभव सहकार महर्षी पॅनलच्या जिव्हारी लागला आहे.

गेल्या 30 ते 40 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर निमगाव ग्रामविकास आघाडीला ग्रामपंचायतीवर निर्भेळ सत्ता प्रस्थापित करता आली असून या अगोदर या गटाला गावात कधीही मताधिक्य नव्हते परंतु मात्र 2022 च्या निवडणुकित

“भूमीपुत्र न्यूज, वास्तव बातमी”

निमगाव ग्रामविकास आघाडीला निमगावात मताधिक्य मिळाले असून एकूण मतदानाच्या 51.59% एवढे मतदान निमगाव ग्रामविकास आघाडीला झाले तर सहकार महर्षी पॅनलला 47.12% मतदान झाले आहे तर दोघांनाही मतदान नको म्हणून गावातील 1.29 % लोकांनी नोटाला पसंती दिली आहे .

प्रभाग क्रमांक 2 मध्ये जयश्री ज्ञानदेव शेंडे व अर्चना बाळू मंडले यांना प्रत्येकी 531 मते पडल्याने चिठ्ठी टाकण्यात आली ही चिठ्ठी ही निमगाव ग्रामविकास आघाडीच्या पारड्यात पडल्याने अर्चना बाळू मंडले यांना विजयी घोषित करण्यात आले तर नेहमीप्रमाणेच सहकार महर्षी पॅनलला प्रभाग क्रमांक 1 मधून सर्व विजय उमेदवारांमध्ये सर्वात जास्त मताधिक्य घेऊन निवडून आलेल्या उमेदवार मनीषा मधुकर साठे यांना 371 मतांचे सर्वाधिक लीड आहे क्रमांक 2 ला प्रभाग क्रमांक 5 मधील अंकुश जाधव यांना 355 मतांचे दुसऱ्या क्रमांकाचे लीड आहे

“भूमीपुत्र न्यूज, वास्तव बातमी”

तर तिसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य प्रभाग क्रमांक 6 मधील वृषाली अमर मगर यांना तर चौथ्या क्रमांकाचे मताधिक्य नंदिनी शिवाजी मगर यांना 324 मतांचे तर क्रमांक पाच मताचे लीड हे प्रभाग क्रमांक 1 मधील बोडरे कल्याण सत्याप्पा यांना 323 मतांचे आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!