महाराष्ट्रमाळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

बिजवडीची सुकन्या समृद्धी यादव पॅरिस येथे सिल्वर मेडल ने सन्मानित

भूमीपुत्र न्यूज

बिजवडी ता माळशिरस व सध्या पुणे पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास असलेली समृद्धी दत्तात्रय यादव हिस इथेनिक सोलो या नृत्य प्रकारात पॅरिस फ्रान्स येथे सिल्वर मेडलने सन्मानित करण्यात आले अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, युनेस्को कल्चरल विभाग व भारत सरकार यांच्या विद्यमाने 13 वे कल्चरल डान्स ऑलिपॅड दि. 12 सप्टेंबर पासून पॅरिस, फ्रान्स येथे सुरू झाले होते यात समृद्धी यादव हिने इथेनिक सोलो या डान्स प्रकारांमध्ये दुसरा क्रमांक (सिल्वर मेडल) संपादित केला.

ए बी. एस. एस. च्या चेअरपर्सन रत्ना वाघ, हेमंत वाघ तसेच युनेस्कोच्या कल्चरल कमिटीचे चिप जुडेत व्हॅन झडेन यांच्या हस्ते तिला सिल्वर मेडल देऊन गौरविण्यात आले. तिच्या या यशाबद्दल आ. महेश लांडगे, सारिकाताई पवार, कविता हिंगे, अजय पताडे, पंकज निकम व पिंपरी चिंचवडकरांनी तिचे अभिनंदन केले. समृद्धी सध्या डॉ. भानुबैन नानावती कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर NANAVATI पुणे. येथे वास्तुशास्त्र विभागात चौथ्या वर्षात शिकत आहे. सन 2010 पासून समृद्धीने आजतागायत आंतरराष्ट्रीय स्तरावर सहा वेळा भाग घेऊन गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉझ मेडल जिंकली आहेत. थायलंड, मलेशिया, दुबई, सिंगापूर, मॉरीसिस अशा विविध देशांमध्ये तिने आपली नृत्यकला सादर केली आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन, अखिल भारतीय नाट्य संमेलन, पुणे फेस्टिवल, दम दमा दम, इंद्रा या सिनेमांमध्ये विविध ठिकाणी तिने नृत्य सादर केले आहे. सन 2017 मध्ये तिला राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट नृत्यकलाकार म्हणून ज्येष्ठ नेते खा शरद पवार यांच्या हस्ते गौरवण्यात आले होते. आत्तापर्यंत समृद्धीला 200 पेक्षा जास्त ट्रॉफी, मेडल व सर्टिफिकेट मिळाली आहेत. तिच्या या यशामध्ये तिचे वडील दत्तात्रय यादव ,आई सुमन यादव व भाऊ सारंग यादव यांचे विशेष सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!