जमीन वाटून देत नाही म्हणून मुलांनीच जन्मदात्या पित्याचे हातोड्याने मोडले दोन्ही पाय
भूमीपुत्र न्यूज/ रशीद शेख ,चांदापुरी
बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी सकाळी 10.45 च्या सुमारास शशिकांत बाळकृष्ण सातपुते वय वर्ष 56 रा शेटे वस्ती, चांदापुरी ता माळशिरस हे घराच्या अंगणात बसले असता मुलगा ज्ञानेश्वर शशिकांत सातपुते, संगम शशिकांत सातपुते ,सून अनिता ज्ञानेश्वर सातपुते व अनुराधा संगम सातपुते आणि पत्नी अलका शशिकांत सातपुते यांनी दिवाणी कोर्टात जमीन वाटपाचा दावा दाखल असताना शशिकांत बाळकृष्ण सातपुते यांना जमीन वाटपाच्या कारणावरून आरोपी संगम सातपुते यांनी शशिकांत सातपुते यांना कवळ्यात धरून खाली पाडून अंगावर बसून याला सारखे जमिनीचे वाटप करून दे असे म्हणून देखील जमिनीचे वाटप करून देत नाही ,आज याला जिवंत ठेवायचे नाही असे म्हणून शिवीगाळ केली.
तर दुसरा मुलगा आरोपी ज्ञानेश्वर सातपुते याने लय वळवळ करतो याला जिवंत सोडायचे नाही असे म्हणून त्याच्या हातातील हातोड्याने शशिकांत बाळकृष्ण सातपुते म्हणजे स्वतःच्या वडिलांना जिवे ,ठार मारण्याच्या उद्देशाने दोन्ही पायावर मारून पायाचे हाडाचा चुरा करून फॅक्चर केले तसेच सून अनिता सातपुते हिने लोखंडी पाईपने व दुसरी सून व आरोपी अनुराधा सातपुते हिने लोखंडी गजाने शशिकांत बाळकृष्ण सातपुते यांच्या पायावर मारहाण केली तर त्यांची स्वतःची पत्नी अलका शशिकांत सातपुते हिने काठीने कमरेवर व उजव्या हाताच्या पंजावर मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून मुलगी धनश्री हिला शिवीगाळ दमदाटी करून हाताने लाथा बुक्क्यानी मारहाण केली .
या आशयाची फिर्याद शशिकांत बाळकृष्ण सातपुते यांनी माळशिरस पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली असून संबंधित आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 307 ,323, 504, 506, 143, 147 ,148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे जन्मदात्या पित्याचेच दोन्ही पाय मोडल्याने व माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचे सर्वत्रच निषेध व्यक्त केला जात आहे