अकलूज येथे निर्माणरत्न’ पुरस्काराचे थाटात वितरण
भूमीपुत्र न्यूज
अभियंता दिनाचे औचित्य साधून ‘निर्माणरत्न’ पुरस्काराचे वितरण अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवांजली एन्टरप्रायजेस आणि विकाट सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने गत दोन वर्षापासून बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना ‘निर्माणरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते या पुरस्कार वितरण सोहळ्यास विकाट सिमेंटचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख समित परमार आणि जिल्हा प्रमुख अतुल पवार आयोजक जगदीश कदम, जयंतराव कदम, अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष अतुल सरडे यांच्यासह परिसरातील अभियंते उपस्थित होते.
प्रास्ताविकात जे के प्रमोटर्स अँड डेव्हलपर्सचे जगदीश कदम यांनी पुरस्कार निर्माण रत्न पुरस्कार याबाबतची माहिती व उद्देश स्पष्ट केला.
या सोहळ्यात बबनराव शेंडगे, विनीत बोरावके ,शंतनू टिळेकर ,बाळासो घोगरे चंद्रशेखर मोकाशी यांना निर्माण रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी नूतन कनिष्ठ अभियंता म्हणून नुकतीच नियुक्ती झालेल्या शशांक गवसने, प्रियांका मगर ,अतुल रुपनवर व अमरसिंह पताळे यांचाही विशेष गौरव करण्यात आला. लेखक डॉ. प्रेमनाथ रामदासी यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांनी कौतुकाची थाप पाठीवर पडली तर ती व्यक्ती अजून जोमाने कार्य करीत यशाच्या शिखरावर पोहोचते त्यामुळे अभियंता दिनाचे औचित्य साधून ‘निर्माणरत्न’ पुरस्कार देऊन गौरव करणे ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी विकाट सिमेंटचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख समित परमार व पुरस्कार्थींच्या वतीने बबनराव शेंडगे यांनी मनोगत व्यक्त केले आभार प्रा. संजय जाधव यांनी मानले