संत गाडगेबाबा जयंती निमित्त….
अकलूजच्या बसस्थानकाची राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केली स्वच्छता
भूमीपुत्र न्यूज / संजय लोहकरे
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अकलूजमधील नवीन बस स्थानकाची स्वयंस्फूर्तीने स्वच्छता केली.
बस स्थानक परिसरात येणाऱ्या लोकांनी बेफिकीरपणे टाकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या,पाण्याच्या बाटल्या व इतर घनकचरा टाकून सातत्याने बस स्थानक परिसर परिसर अस्वच्छ करीत आहेत हा अस्ताव्यस्त पडलेला कचरा पाहून शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने बस स्थानकाची स्वच्छता केली .
याचबरोबर रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांना जाहिरातीचे बॅनर-पोस्टर लावताना लोकांनी मारलेल्या खिळ्यांमुळे झाडांची हानी होत असल्याचे दिसून आल्याने स्वयंसेवकांनी झाडाचे खिळे काढून बस स्थानक परिसराची पर्यावरण पूरक स्वच्छता केल्याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकाचे कौतुक होत आहे.या स्वच्छता मोहिमेत राष्ट्रीय सेवा योजनेचे आजी-माजी स्वयंसेवक सहभागी झाले होते. स्वयंसेवक सत्यजित चव्हाण,नागनाथ साळवे,प्रशांत वाघमारे,विनायक मंडले,प्रसाद शिंदे,अविनाश देशमुख,प्रतीक फुले,निलेश खंडागळे,जुनेद मुलाणी,आदित्य पोतदार आदींनी सहभाग घेतला.यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दत्तात्रय मगर,डॉ.सविता सातपुते,प्रा.सज्जन पवार,डॉ.चंकेश्वर लोंढे,डॉ.चंद्रशेखर ताटे-देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.