निमगाव ग्रामपंचायत साठी 87.55% मतदान; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

भूमीपुत्र न्यूज
संवेदनशील ग्रामपंचायत म्हणून प्रशासनाकडे नोंद असणाऱ्या निमगाव ता माळशिरस या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 87.55% मतदान झाले असून वेळापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या निमगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता यामुळे मतदानादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
निमगाव ग्रामपंचायत मध्ये एकूण 6284 एवढे मतदार असून यामध्ये 3189 पुरुष आणि 3095 स्त्री असे मतदार आहेत यापैकी 5502 एवढ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
वॉर्डनिहाय मतदार झालेली आकडेवारी
वार्ड क्रमांक 1
एकूण मतदान 1009
झालेले मतदान 876
टक्केवारी 86.81%
वार्ड क्रमांक 2
एकूण मतदान 1273
झालेले मतदान 1096
टक्केवारी 86.09%
वार्ड क्रमांक 3
एकूण मतदान 936
झालेले मतदान 845
टक्केवारी 90.27%
वार्ड क्रमांक 4
एकूण मतदान 1097
झालेले मतदान 952
टक्केवारी 86.78%
वार्ड क्रमांक 5
एकूण मतदान 1028
झालेले मतदान 890
टक्केवारी 86.57%
वार्ड क्रमांक 6
एकूण मतदान 941
झालेले मतदान 843
टक्केवारी 89.20%
असे एकूण सर्व वॉर्डात सरासरी 87.55% एवढे मतदान झाले असून मतमोजणी मंगळवार दि 20 डिसेंबर रोजी माळशिरस येथे नवीन शासकीय धान्य गोडाऊन म्हसवड रोड, माळशिरस या ठिकाणी होणार आहे .




