माळशिरस तालुकासामाजिक
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अभिवादन

भूमीपुत्र न्यूज
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अकलूज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष सचिन कांबळे,युवक तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड,तालुका कार्याध्यक्ष हेमंत कांबळे,तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे,अकलूज शहराध्यक्ष मिलिंद पवार,युवक तालुका संपर्कप्रमुख शिवम गायकवाड,अकलूज शहर संपर्कप्रमुख शिवाजी खडतरे,शहर कार्याध्यक्ष कबीर मुलाणी,अविनाश सोनवणे,राजू बागवान,साजिद बागवान यांचेसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते .




