निमगावात बिबट्या सदृश्य प्राण्याने कुत्र्यावर हल्ला करून कुत्रे केले ठार
भूमीपुत्र न्यूज
निमगाव मगराचे येथील निमगाव -मळोली रस्त्यावर हिरालाल शेख यांच्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या वस्तीवर शनिवार दि 4 मार्च रोजी पहाटे 2 ते 3 च्या दरम्यान बिबट्या सदृश्य प्राण्याने डॉबरमॅन जातीच्या कुत्र्यावर हल्ला करून कुत्र्याला ठार केले असून त्या कुत्र्यास पाठीमागच्या बाजूने अर्धवट खाऊन तसेच सोडून धूम ठोकली आहे . यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
याबाबत हिरालाल शेख यांचे चिरंजीव जमीर शेख यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरा द्वारे त्या बिबट्या सदृश्य प्राण्यांचे ठसे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविल्यानंतर माळशिरसच्या वन विभागाचे अधिकारी सकाळी लवकरच या ठिकाणी येतील असे सांगण्यात आले वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आल्यानंतर नक्की ठसे कोणत्या प्राण्याचे आहेत ? ही माहिती घेण्यात येईल व यानंतर या कुत्र्यास ठार करून खाणारा नेमका प्राणी कोणता आहे हे सांगता येईल
निमगाव मळोली रस्त्यावर हिरालाल शेख यांच्या शेतातील वस्तीवर कुत्र्यास ठार केले असून अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत सोडून दिले आहे आम्हास अशी माहिती मिळाल्याने आमचे कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन त्या ठशांची माहिती घेत आहेत नागरिकांनी भयभीत होऊ नये मात्र रात्रीच्या वेळी उजेड करावा जेणेकरून उजेडात असे प्राणी येत नाहीत लवकरच आपणास योग्य ती माहिती देण्यात येईल .
दयानंद कोकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी माळशिरस