अकलूज, माळेवाडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

भूमिपुत्र न्यूज /केदार लोहकरे
अठराव्या शतकात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानाची गंगा सर्व सामान्य गोरगरीबांच्या घराघरात पोहचवली.स्त्रीयांना शिक्षणाची दारे खुली केली.चूल आणी मूल या समाजातील संकल्पनेला विरोध पत्कारून मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले.त्याचाच परिणाम आज २१ व्या शतकात मुली सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत.आज महिल सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून स्त्रीया स्वकर्तृत्वान बनल्या आहेत. असे गौरवोद्गार डॉटर मॉम फाउंडेशनच्या अध्यक्षा व माजी जि प सदस्य शितल देवी मोहिते पाटील यांनी काढले
त्या माळेवाडी, अकलूज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 192 वी जयंती निमित्त आम्ही सावित्रीच्या लेकी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलत होत्या , फुले निवास येथे सोलापूर जि.प.माजी सदस्या सुनंदाताई फुले यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात बोरगांव येथील सुप्रसिध्द बासरी वादक प्रविण साठे यांनी बासरी वादन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले,लहान मुलांची भाषणे,आरोग्य विषयक माहिती, ओवी ,गवळण गायन अधिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते.यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई, राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2022 प्राप्त झाल्याबद्दल ललीतागौरी राणे, प्रतिभा गोडसे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष नितीन कुदळे,बाळासाहेब एकतपुरे, ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष शंकरराव काकुळे ,प्रा बलभीम काकुळे,डॉ.पांडूरंग नलवडे ,राजीव बनकर,बाळासाहेब फुले,बाळासाहेब एकतपुरे, समाधान देशमुख,रामचंद्र चौधरी,सुहास क्षीरसागर,मनोहर एकतपुरे , कांतीलाल एकतपुरे,सुलभा फुले,रतन कवळस,राणी एकतपुरे,प्रतीक्षा एकतपुरे अंगणवाडी सेविका व मदतनीस, जिल्हा परिषद आरोग्य विभाग केंद्राचे डॉक्टर ,सिस्टर, आशा वर्कर तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे सिस्टर सुरेखा केदारे, तनुजा केंजळे,सुनिता भालेराव आदी मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनंदाताई फुले सूत्रसंचालन प्रतिभा गोडसे यांनी तर आभार मृणालिनी फुले यांनी मानले.




