गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला वेळापूर पोलिसांनी केले जेरबंद
भूमीपुत्र न्यूज
वेळापूर पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असताना वेळापूर बस स्थानकाच्या बाजूस सागर संभाजी जाधव वय वर्षे 28 रा. घुमेरा ओढा, वेळापूर हा वेळापूर पोस्टहद्दीमध्ये गोंधळ करताना मिळून आला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केले असता सदर इसमावर सांगोला पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 224/ 2024 भादवी कलम 307,143 , 147,148,149 323,324 ,504 ,506 मध्ये वरील आरोपी फरार असल्याची माहिती मिळाल्याने त्याची खातरजमा सांगोला पोलीस स्टेशन येथे फोन करून केली असता सदरच्या आरोपी हे गुन्हा घडल्यापासून फरार असल्याचे समजले.
सदर आरोपीस सांगोला पोलीस स्टेशन चे अंमलदार यांना बोलवून त्यांचे ताब्यात देण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे ,अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर,पोलीस उपाधीक्षक नारायण शिरगावकर ,अकलूज उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलीस स्टेशन मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी, पोलीस उपनिरीक्षक मदने ,पो हे पाटील , लिंगडे, शिरसागर व चालक पठाण यांनी केली आहे. वेळापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात यश आले आहे याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.