निमगावचे माजी उपसरपंच नंदकुमार मगर- पाटील बिनविरोध
मोहिते-पाटील समर्थकांमध्ये जल्लोष
भूमीपुत्र न्यूज
निमगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 6 मधून उमेदवारी अर्ज भरलेले निमगावचे माजी उपसरपंच नंदकुमार मगर-पाटील हे त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरलेल्या दत्तात्रय रावसो मगर, धैर्यशील कृष्णराव पाटील व विराज नंदकुमार पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने नंदकुमार प्रभाकर मगर पाटील हे बिनविरोध निवडून आले असून त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करण्याचे बाकी आहे .
बुधवार दिनांक 7 डिसेंबर रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेण्याची वेळ होती या वेळेत प्रभाग क्रमांक 6 मधून नंदकुमार प्रभाकर मगर पाटील यांच्यासह उमेदवारी अर्ज भरलेल्या एकूण 4 उमेदवारांपैकी 3 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने नंदकुमार मगर पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे 2017 ते 2022 या 5 वर्षाच्या कालावधीत नंदकुमार मगर पाटील यांनी निमगावच्या उपसरपंच पदाचा यशस्वी व विकासाचा कार्यकाल पूर्ण केला आहे विशेषता सन 2018- 19 च्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये स्वखर्चाने गावासाठी केलेली पिण्याच्या पाण्याची सोय, याचबरोबर त्यांनी प्रभाग क्रमांक 6 मध्ये केलेली विविध विकास कामे, नीरा उजवा कालव्यावर अवलंबून असणाऱ्या फाटा क्रमांक 65 वर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची शेतीपाण्याची व्यवस्था , दलीत वस्ती सुधारणा अंतर्गत रस्ते तयार करणे, हायमास्ट दिवे बसविणे , प्रभाग 6 मध्ये लोकांना येण्या जाण्यासाठी हक्काचा रस्ता मिळवून देणे,शेती बांधाचे तंटे मिटविणे,जनतेच्या अडीअडचणी सोडविणे,लोकांबरोबर असलेला दृढ संबंध यातूनच त्यांच्या विरोधात उभे राहण्यासाठी कोणीही तयार नव्हते तरीही विरोधी गटाकडून त्यांच्या विरोधात केवळ एकमेव अर्ज आला होता तो ही अर्ज काढून घेतल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे केलेल्या विकास कामांच्या जोरावरच ते बिनविरोध निवडून आल्याची चर्चा होत आहे .
नंदकुमार प्रभाकर मगर पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मोहिते पाटील समर्थक असणाऱ्या स म शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक व मल्लसम्राट रावसाहेब मगर यांच्या पॅनल मधून भरला होता यामुळे या बिनविरोध निवडीमुळे या पॅनलला ऊर्जा प्राप्त झाली असून एकूण 17 सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच पदाबरोबर उर्वरित जागा निवडून आणण्यासाठी या पॅनलला सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
आमचे नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व शिवामृत दूध उत्पादक सह संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील कार्यकाळात गावात विविध विकास कामे करता आली यामुळेच आज माझी बिनविरोध निवड झाली आहे यापुढेही मोहिते पाटील परिवाराच्या मार्गदर्शनाखाली गावांत जास्तीत जास्त निधी आणून विकास करण्याचा मानस आहे.
नंदकुमार मगर पाटील
बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य निमगाव (म)