अकलूज मधील बंद अवस्थेत असलेल्या कोविड सेंटरला आग;सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान
भूमीपुत्र न्यूज
कोरोना-१९ मधील सध्या बंद अवस्थेत असणा-या अकलूज कोव्हिड सेंटरला लागलेल्या आगीत सुमारे ३ लाख १५ हजाराचे साहित्य जळून भस्मसात झाले असुन सदर घटनेची अकलूज पोलीस ठाण्यात जळीत नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,कोरोना १९ च्या दुस-या लाटेत कोरोना रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी शासन आदेशान्वये अकलूज येथे पर्यटन विकास महामंडळाच्या इमारती एप्रिल २०२१ रोजी कोव्हिड सेंटर सुरु करण्यात आले होते.कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर सदर सेंटर आक्टोंबर २०२१ पर्यंत सुरु होते.त्यानंतर शासनाच्या आदेशानुसार सदरचे कोव्हिड सेंटर बंद करण्यात आले होते.आज शनिवार दि.२१ जानेवारी रोजी दु.१२ वा.च्या सुमारास बंद स्थितीत सदर कोव्हिड सेंटरच्या हाॅलमध्ये ठेवलेले ५०० गादी,२५० बेडशीट,४५० उशी,३५० चादर, १०० बकेट,५० ड्रम सॅनिटायझर,४०० उशी कव्हर,सिलींग फॅन ४,झाडू१५०, ४०ड्रम फिनेल,१५०टाॅवेल,५ लोखंडी काॅट,१०० अंघोळीचे मग व स्टेशनरी साहित्य असे एकुण ३लाख १५ रुपये किंमतीचे साहित्य कशाने तरी जळून नुकसान झाल्याची प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरनगरचे कर्मचारी विलास सुखदेव झुरळे वय 43 यांनी दिलेल्या खबरीवरुन सदर घटना अकलूज पोलीस ठाण्यात जळीत दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलीस हवालदार लक्ष्मण पिंगळे हे करीत आहेत.