कोरोना कालावधीत आई-वडील गमावलेल्या मुलांच्या संस्थेस आपला युवक शेतकरी फोरमकडून आर्थिक मदत
भूमीपुत्र न्यूज
कोरोना काळात ज्यांचे आई वडील मृत्युमुखी पडले आहेत अशा अनाथ बालकांचा संभाळ करणाऱ्या पुणे येथील कोकण कला शिक्षण विकास संस्थेच्या श्री लोचन बाल विकास या संस्थेस आपला युवक शेतकरी फोरमचे मुख्य प्रवर्तक व अध्यक्ष ॲड एम एम मगर यांच्याकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे.
140 एवढी अनाथ बालके सांभाळणाऱ्या या संस्थेच्या संचालिका यांनी आपला युवक शेतकरी फोरम चे मुख्य प्रवर्तक अध्यक्ष ॲड एम एम मगर यांचेशी संवाद साधला व अनाथ बालकांची व्यथा मांडली यानंतर सर्व परिस्थिती ऐकुन व खात्री करून आपला युव शेतकरी फोरम तर्फे 5000/- (पाच हजार रुपये) अनाथ बालकांना मदत म्हणून ॲनलाईन रक्कम अदा केली व या संस्थेस शासनाकडुन व इतर संस्थेकडून शक्य होईल तेवढी मदत मिळवुन देण्याचे आश्वासन ॲड एम एम मगर यांनी दिले. आपला युवक शेतकरी फोरम चे खजिनदार रामभाऊ मस्के यांनी सदर संस्थेस रक्कम पाठविण्याचे काम करुन त्या संस्थेशी संवाद साधुन माहिती घेतली.