माळशिरस तालुकासामाजिक

चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायतच्या वतीने डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

भूमीपुत्र न्यूज

चौंडेश्वरवाडी ता माळशिरस ग्रामपंचायतीच्या वतीने सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चौंडेश्वर वाडी येथे मोफत सर्व रोग आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात जवळपास दोनशे रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अवांतर खर्चास फाटा देऊन सर्वसामान्यांसाठी चौंडेश्वर वाडी ग्रामपंचायत ने मोफत आरोग्य तपासणी राबविल्याबद्दल त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या आरोग्य शिबिरात रक्त तपासणी, लघवी तपासणी, साखर तपासणी याबरोबरच सर्व आजारांच्या तपासण्या करण्यात आल्या व यावर तज्ञ डॉक्टरांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायत सरपंच अलका इंगवले देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स म शंकराव मोहिते पाटील, रत्नप्रभादेवी मोहिते पाटील व लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले व शिबिराची सुरुवात करण्यात आली शंकरनगर प्राथमिक आरोग्य केंद्र व चौंडेश्वरवाडी उपकेंद्रातील डॉ प्राजक्ता साळवे,डॉ रेखा खटके, डॉ संभाजी गंगाधरे, लॅब टेक्निशियन सुवर्णा कारंडे, विलास झुरळे, संजय कांबळे, महादेव दडस, आरोग्य सहायिका सुप्रिया मोटे, श्रीमती ओव्हाळ ,श्रीमती वसावे यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमासाठी सरपंच अलका इंगवले देशमुख, सदस्य नितीन साखळकर, सचिन सोनवणे, हुसेन शेख, बाळू सय्यद, वल्लभ गुजर, ग्रामविकास अधिकारी सावंत, मार्गदर्शक शिवाजीराव इंगवले देशमुख, धनाजी साखळकर, यशवंतराव लावंड, बाबासाहेब ननवरे ,समाधान इंगवले देशमुख ,दिलीप माने ,श्रीमंत लांडगे, रणजीत कुडाळे, राजू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!