माळशिरस तालुकाराजकियसोलापूर जिल्हा

अकलूज प्रभाग क्र. ८ मध्ये ४० लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ; नगरसेवक महेश शिंदे व नगरसेविका दिपाली वाघमोडे यांच्या प्रयत्नांना यश!​

भूमीपुत्र न्यूज

अकलूज नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ मधील विविध विकासकामांचा शुभारंभ नुकताच अत्यंत उत्साहात संपन्न झाला. जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) अंतर्गत मंजूर झालेल्या तब्बल ४० लाख रुपयांच्या निधीतून प्रभागात विविध रस्ते आणि गटारींच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले आहे.

​

स्थानिक नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या मागण्यांना प्राधान्य देत, नगरसेवक महेश शिंदे व नगरसेविका दिपाली वाघमोडे यांच्या विशेष पाठपुराव्यातून आणि आमदार रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून हा महत्त्वपूर्ण निधी मंजूर करण्यात आला होता.​

या ४० लाखांच्या निधीतून प्रभागातील अनेक अंतर्गत रस्ते आणि गटारांची कामे मार्गी लागणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील कामांचा समावेश आहे:​नवीन बाजार तळ येथील शंकर डावरे यांच्या घरासमोरील गटार.​अजित बडे यांच्या घरासमोरील गटार व रस्ता.​जावीर ते कांबळे रस्ता व गटार.​१०/७० झोपडपट्टी येथील रस्ता व गटार.​मलबार ते ओढ्यापर्यंतची गटार निर्मिती.​अजित गांधी यांच्या घरासमोरील गटार.​संतोष वाघमोडे यांच्या घरासमोरील रस्ता व गटार.​बोर्डे वसाहत येथील गटारीवरील रस्ता.​

​

या विकासकामांच्या पूर्ततेमुळे प्रभागातील रस्ते व ड्रेनेज सिस्टीम सुधारणार असून, नागरिकांची अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली गैरसोय दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.​या उद्घाटन प्रसंगी अकलूज नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभागाच्या विकासासाठी नगरसेवक महेश शिंदे आणि नगरसेविका दिपाली वाघमोडे यांचे प्रयत्न आगामी काळातही असेच अविरत सुरू राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!