तांदुळवाडी, वेळापूर, श्रीपुर व नातेपुते या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या बुधवारी 1 नोव्हेंबर रोजी होणार शांतता सभा; समाजास केले जाणार शांततेचे आवाहन
भूमीपुत्र न्यूज
मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असताना जाणीवपूर्वक काही समाज विघातक प्रवृत्ती आंदोलनाला गालबोट लागावे म्हणून हिंसक आंदोलन करीत आहेत हे चुकीचे असून यासंदर्भात माळशिरस तालुक्यात जनजागृती करून सकल मराठा समाजास शांततेचे आवाहन करण्यासाठी सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने 1 नोव्हेंबर 2023 रोजी माळशिरस तालुक्यात तांदुळवाडी ,वेळापूर ,श्रीपुर व नातेपुते या 4 ठिकाणी सभा होणार असल्याची माहिती सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने अकलूज येथे घेण्यात आलेल्या बैठकीत दिली.
अकलूज येथे झालेल्या बैठकीत बीड येथील समाज विघातक प्रवृत्ती कडून घडलेल्या हिंसक घटनेचा निषेध करण्यात आला असून माळशिरस तालुका हा शांतता प्रिय तालुका असून काही समाजविघातक प्रवृत्ती स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सकल मराठा समाज बांधवांना चेतावत आहेत अशा संधी साधू समाजविघातक प्रवृत्ती पासून समाज बांधवांनी सावध राहावे व शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावेत या आवाहनासाठी माळशिरस तालुक्यात 4 ठिकाणी शांतता सभेचे आयोजन केले आहे.
तांदुळवाडी येथे 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.45 वा शांतता सभा होणार असून या ठिकाणी कोळेगाव ,फळवणी, मळोली ,शेंडेचिंच व तांदूळवाडी या गावासह आसपासच्या गावातील समाज बांधवांनी उपस्थित राहावे यानंतर वेळापूर येथे सकाळी 9.45 वा होणाऱ्या सभेसाठी वेळापूर आणि आसपासच्या परिसरातील समाज बांधवांनी उपस्थित राहावे तर श्रीपुर या ठिकाणी सकाळी 10.30 वाजता होणाऱ्या सभेसाठी श्रीपुर व आसपासच्या परिसरातील सर्व सकल मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे यानंतर सायंकाळी 5.30 वाजता नातेपुते या ठिकाणी होणाऱ्या शांतता सभेसाठी नातेपुते आणि आसपासच्या परिसरातील सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.
1 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8 वाजता अकलूज पासून सुरू होणारा शांतता सभेचा दौरा आहे मात्र काही समाजकंटक , संधी साधू व स्वार्थी लोक मराठा समाजाला भडकविण्याचे काम करीत आहेत अशा लोकांपासून समाज बांधवांनी सावध राहावे व कोणतेही हिंसक कृत्य करू नये अन्यथा समाज त्या घटनेची जबाबदारी घेणार नाही असाही इशारा या बैठकीत देण्यात आला.