सोलापुरात दांडिया उत्सव २K२६ ला अभूतपूर्व प्रतिसाद; ५,८८३ महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

भूमीपुत्र न्यूज
जगदीश पाटील मित्रपरिवार प्रतिष्ठान यांच्या वतीने सोलापूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य दांडिया उत्सव 2026 चा शुभारंभ मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते माता दुर्गादेवीच्या पूजनाने करण्यात आले. यावेळी महिलांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला.

या दांडिया उत्सवात तब्बल ५,८८३ महिला व मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पारंपारिक वेशभूषा, दांडियाच्या तालावर थिरकणारी पावले आणि ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण वातावरण दांडियामय झाले होते. परंपरा, संस्कृती आणि महिला सक्षमीकरणाचा सुंदर संगम या उत्सवातून पाहायला मिळाला.

महिलांना एकत्र आणणे, त्यांच्यातील कलागुणांना वाव देणे आणि समाजात एकतेची भावना वृद्धिंगत करणे हा या आयोजनामागचा मुख्य उद्देश होता. सोलापूरकर महिलांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे हा उद्देश सफल झाला आहे.
या कार्यक्रमास शहर अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता ताई चाकोते, डॉ श्रद्धा राहुल जवंजाळ,अमित पाटील, गोपाळ सोमाणी,राजू सुरवसे, ॲड.अंबरीश खोले,सुमित पाटील यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदीश पाटील मित्रपरिवार प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
आयोजकांनी सर्व सहभागी महिला, सहकार्य करणारे मान्यवर आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.




