पी आर पी च्या महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्षपदी सोमनाथ भोसले

सोलापूर जिल्हाध्यक्षपदी अमित कांबळे
भूमीपुत्र न्यूज
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्षपदी अकलूज येथील सोमनाथ भोसले यांची तर सोलापूर जिल्हाध्यक्षपदी अमित कांबळे यांची निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा खासदार लॉंगमार्च प्रणेते जोगेंद्र कवाडे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन करण्यात आली

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात सोमवार 6 फेब्रुवारी रोजी या निवडीचे आयोजन करण्यात आले होते निवड करताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे बोलताना म्हणाले, सोमनाथ भोसले यांनी राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडून पक्षाची ताकद वाढवली आहे वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करून सर्वसामान्यांना न्याय दिलेला आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महाराष्ट्र युवक अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करीत असताना आनंद होत आहे त्यांच्या खांद्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या युवकांचे जाळे त्यांनी निर्माण करून पक्ष आणखी मजबूत करावा पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे

सोलापूर शहराध्यक्ष अमित कांबळे यांनीही सोलापूर शहरामध्ये पक्षाचे चांगले काम केल्याने सोमनाथ भोसले यांच्या रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदाच्या जागेवर त्यांना बढती देऊन त्यांचीही सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली निवडीनंतर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांनी दोघांनाही पेढे भरवून सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले,उल्हासनगर महापालिकेचे नगरसेवक व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र संघटक प्रमोद टाले,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रक्ष प्रवक्ता राजेशभाई जाधव,मुंबई प्रदेश अध्यक्ष विजय वाघमारे,महाराष्ट्र युवक संघटक कपिल लिंगायत, माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांचे स्वीय सहाय्यक आनंद कडाळे यांनीही दोघांना शुभेच्छा दिल्या.सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबई येथील प्रदेश कार्यालयासमोर हालगीनाद करून फटाके फोडून आनंद व्यक्त केला.निवडीनंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी दादर चैत्यभूमी येथे जावून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष विश्वजीत सरवदे,सोलापूर शहर संपर्कप्रमुख शरणू हजारे, शहर कार्याध्यक्ष अनिल सोनकांबळे यांचेसह माळशिरस तालुकाध्यक्ष सचिन कांबळे,तालुका कार्याध्यक्ष हेमंत कांबळे,युवक तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, कार्याध्यक्ष अमित जवंजाळ,तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे,संघटक पांडुरंग चव्हाण,पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन जाधव,तालुका सरचिटणीस गणेश गायकवाड,युवक तालुका संपर्कप्रमुख शिवम गायकवाड,अकलूज शहर संपर्कप्रमुख शिवाजी खडतरे,शहर युवक कार्याध्यक्ष शहाजी खडतरे,शहर सचिव साजिद बागवान, बाबासाहेब ननवरे,वैभव आंबुरे,अनिकेत शिंदे,आदर्श गायकवाड,जावेद शेख,आदेश थोरात,राजू बागवान, प्रशांत भोंडवे,अमोल शिवपालक,रोहन गायकवाड,माऊली गायकवाड यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



