महाराष्ट्र

1 लाख 20 हजार रुपये देऊन”पठाण फॉर पठाण” म्हणत पठाणवस्ती येथील युवकांनी अकलूजच्या श्रीराम थिएटर मधील पठाण सिनेमाचा एक शो केला बुक

भूमीपुत्र न्यूज

बॉलीवूड अभिनेता शाहरुखान याचा बहुचर्चित पठाण हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित झाला असून या सिनेमाचा 26 जानेवारी रोजीचा अकलूज येथील श्रीराम सिनेमा थिएटरमधील 3 ते 6 चा शो पठाणवस्ती ता माळशिरस येथील “एस आर के फॅन्स क्लब” ने 1लाख 20 हजार रुपये देऊन संपूर्ण शो ची 600 तिकिटे बुक केल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा बहुचर्चित पठाण हा सिनेमा प्रदर्शना आधीच अनेक वादात अडकला होता या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही देशभरात ठीक ठिकाणी अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते परंतु हा चित्रपट महाराष्ट्रात 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आणि माळशिरस तालुक्यातील पठाणवस्ती येथील युवकांनी अकलूज येथील श्रीराम थिएटर मधील संपूर्ण शोची 1लाख 20 हजार रुपयांची 600 तिकिटे बुक केली असून हा सिनेमा पठाणवस्ती येथील अबाल वृद्धांसह महिला व पुरुष एकत्र या सिनेमाचा आस्वाद घेणार आहेत.

माळशिरस तालुक्याच्या दक्षिणेकडे व अकलूज पासून साधारणपणे 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पठाण वस्ती येथे मुस्लिम बहुल लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून आपल्या आडनावाशी साधर्म्य असणारा सिनेमा आपण जरूर पाहावा या हेतूने ही 600 तिकिटे ॲडव्हान्स बुकिंग केली असल्याची माहिती यासिन पठाण यांनी भूमीपुत्र न्यूज शी बोलताना दिली तर हा सिनेमा प्रजासत्ताक दिना दिवशी आपण पाहत आहोत याचं भान ठेवून अकलूज मधूनच तिरंगा रॅली काढून हा सिनेमा पहावयास येणार असल्याचीही माहिती दिली .

गेल्या तीन ते चार वर्षानंतरच प्रथमच बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा चित्रपट प्रदर्शित होत आहे यामुळे सिने रसिकांमध्ये शाहरुख खान यांच्या पठाण या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता असून 26 जानेवारी रोजी चा पठाण चित्रपटाचा 3 ते 6 चा शो माळशिरस तालुक्यातील पठाणवस्ती येथील एस आर के फॅन्स क्लब ने बुक केला असून पठाण आडनावाच्या व्यक्ती हा सिनेमा पाहणार असून हा शो संपूर्णपणे बुकिंग केल्याने शोच्या मध्यंतरात थिएटरच्या वतीने मोफत अल्पोपहार देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करणार

अनिकेत पाटील
श्रीराम सिनेमा
(थिएटर मालक)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!