महाराष्ट्रसोलापूर जिल्हा

सोलापूरच्या सरफराज पठाण यांची गोव्यात चमकदार कामगिरी!ICN Goa 2026 बॉडीबिल्डिंग स्पर्धेत पटकावले रौप्यपदक; द्वितीय क्रमांकाने मिळविला मान

भूमी पुत्र न्यूज

गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या ICN Goa Natural Bodybuilding Competition 2026 या बॉडीबिल्डिंग स्पर्धेत सोलापूरचे सरफराज पठाण यांनी पुरुष शरीरसौष्ठव (Men’s Bodybuilding) प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना रौप्यपदक (Silver Medal) देऊन गौरविण्यात आले.

सरफराज पठाण हे RISE TO FITNESS AKLUJ या जिमशी संबंधित असून, त्यांनी या स्पर्धेसाठी अनेक महिन्यांपासून कठोर मेहनत, नियमित व्यायाम, शिस्तबद्ध आहार आणि सातत्यपूर्ण सराव केला होता. स्पर्धेच्या तयारीदरम्यान त्यांनी घेतलेली मेहनत आणि समर्पण याचे फळ त्यांना या यशाच्या रूपाने मिळाले.गोवा येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला होता. त्यांच्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सरफराज यांनी सोलापूरचे नाव उज्ज्वल केले.या यशाबद्दल त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार, RISE TO FITNESS AKLUJ मधील सहकारी आणि क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या यशाचे श्रेय सरफराज यांनी आपल्या कुटुंबीयांना, मित्रपरिवाराला आणि संपूर्ण तयारीच्या प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांना दिले आहे. आगामी काळातही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करण्याचा त्यांचा संकल्प आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!