महाराष्ट्रमाळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

उजनी येथील पद्मावती देवीचे दागिने चोरणारा गुन्ह्यातील आरोपीस वेळापूर पोलिसांनी शिताफीने पकडले​

वेळापूर प्रतिनिधी

कुर्डूवाडी पोलीस ठाणे हद्दीतील उजनी (ता. माढा) येथील पद्मावती देवीच्या मंदिरात चोरी करणाऱ्या आणि गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असणाऱ्या आरोपीला वेळापूर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. कासलिग बापू शिंदे असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.​२४ जानेवारी २०२४ रोजी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात उजनी येथील पद्मावती देवीच्या मंदिरातील ६,४५,२५०/- रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीस गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी कासलिग बापू शिंदे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. तो आज वेळापूर येथील वीज बोर्डच्या पाठीमागे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

​

त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले.​सुरुवातीला आरोपीने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली आणि खोटे नाव सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता, त्याने आपले खरे नाव आणि गुन्ह्याची कबुली दिली.

​

वेळापूर पोलिसांनी या आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी कुर्डूवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कटटे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोलीस नाईक नितीन लिंगडे, पोलीस शिपाई तानाजी पांढरे, चालक पोलीस शिपाई सुशिल पठाण, आणि महिला पोलीस शिपाई सोनाली शिंदे यांचा सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!