Uncategorized

लढाई ऊसदराची, आरपारची.. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची माळशिरस तालुक्यात गुरुवारी महत्त्वाची बैठक

भूमीपुत्र न्यूज

वाढती महागाई आणि कारखानदारांची मुजोरी हाणून पाडण्यासाठी तसेच उसाला चांगला दर मिळवून देण्यासाठी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ माळशिरस तालुक्याच्या वतीने एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार, दिनांक ५/११/२०२६ ​सकाळी १० वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटना संपर्क कार्यालय, पुणे-पंढरपूर रोड, विझोरी येथे ही बैठक होणार असून ​या महत्त्वपूर्ण बैठकीस माळशिरस तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांनी केले आहे.

“ऊसदाराचा धपका देण्यासाठी” ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, ऊसाला योग्य दर मिळवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आले आहे. ​​ही बैठक जिल्हाध्यक्ष तानाजी काका बागल यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे. वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत उसाला योग्य भाव मिळावा यासाठी या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!