संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विझोरी येथे कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर
भूमीपुत्र न्यूज
विझोरी ता.माळशिरस येथे कॉलेज ऑफ फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित केलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबीरात शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर व ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.या रक्तदान शिबिरात स्वयंसेवक व स्वयंसेविकांसह ग्रामस्थांनी मिळून ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले तर आरोग्य तपासणी शिबिरात ग्रामस्थ व जेष्ठ नागरिक याचे रक्तदाब,रक्तातील साखर व प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी सरपंच पोपट काळे,उपसरपंच गणपतराव काळे,ग्रामपंचायतीचे सदस्य नामदेव काळे,वर्षा बोरकर,जनाबाई शिंदे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काळे,ग्रामसेविका गौरी लांडगे,तानाजी इंगळे,सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ब्लड बॅंकेचे डाॅ.अजित गांधी व ,प्राचार्य डॉ.अनिल भानवसे,प्रा.मुकुंद गाडे,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बापुराव अंकलगी,प्रा.रविराज जळकोटे,प्रा.ऐश्वर्या फुटाणे,गिरीजा साळुंखे,ग्रामस्थ व राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.