तांदूळवाडी येथील वै. ह.भ.प.हनुमंत मिले यांची प्रथम पुण्यतिथी विविध कार्यक्रमाने साजरी
भूमीपुत्र न्यूज
तांदुळवाडी येथील वारकरी संप्रदायातील वासकर फडातील मृदुंगमणी वै. हनुमंत मिले यांचे प्रथम पुण्यतिथीनिमित्त तांदुळवाडी ता माळशिरस येथे विविध कार्यक्रमाने साजरी करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राष्ट्रमाता ,राजमाता जिजाऊ मासाहेब, छ. शिवाजी महाराज, अप्पासाहेब वासकर महाराज व हनुमंत मिले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी नाशिक येथील ख्यातनाम वारकरी संप्रदायाचे संगीत गायक पंडित शंकर वैरागकर (गुरुजी)व त्यांच्या शिष्यांच्या वतीने विविध अभंगाचे शास्त्रीय संगीत रचनेद्वारे सादरीकरण करण्यात आले.
पुणे येथील सुप्रसिद्ध लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी अभंग ,गवळणी गाऊन आदरांजली वाहिली या कार्यक्रमासाठी माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील ,सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे,सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील,मराठा सेवा संघाचे उत्तमराव माने शेंडगे ,विठ्ठल सहकारी कारखान्याचे संचालक कालिदास पाटील ,वाघोलीचे वसंत मिसाळ, पटवर्धन कुरोलीचे मधुकर नाईकनवरे, मिले परिवाराचे नातेवाईक, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड. नागेश काकडे, डॉ.राहुल मिले, सुरेश कुंभार ,नामदेव मिले यांनी विशेष परिश्रम घेतले .